agriculture news in marathi Most of the dams in Marathwada are overflow | Agrowon

मराठवाड्यातील बहुतांश धरणे तुडुंब

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020

औरंगाबाद : यंदा जोरदार पावसामुळे मराठवाड्यातील बहुतांश धरणे तुडूंब आहेत. त्यामुळे यंदा रब्बी व उन्हाळी पिकांची आशा उंचावली आहे.

औरंगाबाद : यंदा जोरदार पावसामुळे मराठवाड्यातील बहुतांश धरणे तुडूंब आहेत. त्यामुळे यंदा रब्बी व उन्हाळी पिकांची आशा उंचावली आहे. सहा जिल्ह्यांतील ६७ मध्यम प्रकल्पात तसेच पाच जिल्ह्यातील ३९४ लघू प्रकल्पातही उपयुक्‍त पाणीसाठा ८० टक्‍क्‍यांपुढे असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली. 

मराठवाड्यातील ८७६ लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह नदीवरील बंधाऱ्यांमधील उपयुक्‍त पाणीसाठा ९३.६३ टक्‍के आहे. यामध्ये ११ मोठ्या प्रकल्पातील ९९.७५ टक्‍के, ७५ मध्यम प्रकल्पांमधील ९१.८१ टक्‍के, ७५२ लघू प्रकल्पांतील ७८.२९ टक्‍के, गोदावरी नदीवरील १३ बंधाऱ्यांमधील ८१.६६ टक्‍के, तर तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २५ बंधाऱ्यांमधील ९३.७४ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठ्याचा समावेश आहे.  

मोठ्या ११ प्रकल्पांपैकी जवळपास सर्वच प्रकल्प तुडूंब आहेत. सात जिल्ह्यातील ७५ मध्यम प्रकल्पांपैकी औरंगाबादमधील १६, जालन्यातील ७, बीडमधील १६, लातूरमधील ८, उस्मानाबादमधील १७, नांदेडमधील ९, तर परभणीमधील २ प्रकल्पांत ९० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त उपयुक्‍त पाणीसाठा आहे. या पैकी ४६ प्रकल्प तुडूंब आहेत. त्यामध्ये औरंगाबादमधील १०, जालना ५, बीड १२, लातूर २, उस्मानाबाद १२, नांदेड ४, तर परभणीमधील एका प्रकल्पाचा समावेश आहे. 

गतवर्षी २० नोव्हेंबरअखेर मराठवाड्यातील ७५ मध्य प्रकल्पांतील उपयुक्‍त पाणीसाठा ५५ टक्‍के, तर २०१८ मध्ये केवळ १६ टक्‍केच शिल्लक होता. ७५२ लघू प्रकल्पांचा विचार करता बीडमधील १२६, लातूरमधील १३२, नांदेडमधील ८८, परभणीमधील २२ व हिंगोलीमधील २६ लघू प्रकल्पांत ८० टक्‍क्‍यांपुढे उपयुक्‍त पाणीसाठा आहे. 

औरंगाबादमधील ९६ लघू प्रकल्पांत ७९ टक्‍के पाणी

गतवर्षी २० नोव्हेंबर अखेरपर्यंत मराठवाड्यातील ७५२ लघू प्रकल्पांत ४८ टक्‍,के तर २०१८ मध्ये केवळ १६ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक होता. औरंगाबाद जिल्ह्यातील ९६ लघू प्रकल्पांत ७९ टक्‍के, तर जालना जिल्ह्यातील ५७ लघू प्रकल्पात ६७ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे.


इतर अॅग्रो विशेष
आधुनिक गुऱ्हाळाद्वारे केवळ चार गुंठ्यात...कोल्हापूर शहरापासून काही किलोमीटरवरील कणेरी...
थंडीत वाढ होण्याची शक्यता पुणे ः राज्यातील काही भागांत अंशतः ढगाळ...
तुरीला दराची झळाळीनांदेड : तूर उत्पादक पट्ट्यात नव्या तुरीची आवक...
इथे १५ मिनिटांत सोडवला जातो प्रश्‍न !पुणे : ‘‘आयएसओ’ मानांकन मिळविणारे आणि काही...
राज्यात साखरेचा महापूरपुणे : राज्यात गेल्या वर्षीची ३६ लाख टन साखर...
तंत्रज्ञान सप्ताहात शेतकऱ्यांना घातली...माळेगाव, जि. पुणे ः भरडधान्य उत्पादन,...
अद्याप ४१२ लाख टन ऊसगाळप बाकीपुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी आतापर्यंत ५३४...
कामे व्यवस्थित करा, अन्यथा पगारातून...पुणे : नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा)...
सरकारचा पसारा आवरासरकार कोणत्याही देशातला एक महत्त्वाचा घटक असतो....
यांत्रिकीकरणाचे वास्तव!मागच्या वर्षात (२०२०) भारतात नऊ महिने कडक...
बर्ड फ्लू ः खबरदारी आणि जबाबदारीमार्च-एप्रिल २०२० पासून देशात कोरोनाच्या...
पोखरलेला ‘पोकरा’नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून (पोकरा) ...
प्रस्थापितांना दणका; तरुणाईची मुसंडी पुणे : राज्यात सोमवारी (ता. १८) ग्रामपंचायतींच्या...
किमान तापमानात वाढ पुणे ः राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र व...
शेतकऱ्यांच्या रॅलीबाबतचा निर्णय ...नवी दिल्ली ः विविध शेतकरी संघटनांकडून प्रजासत्ताक...
गहू, तांदळाच्या दराच्या प्रश्‍नांमुळेच...माळेगाव, जि. पुणे : देशपातळीवर आणि विशेषतः...
निर्यातीची साखर वाहतूक कंटेनर अभावी...कोल्हापूर: केंद्राच्या साखर निर्यात अनुदान...
रंगीत कापसाचा प्रयोग यशस्वीयवतमाळ  ः शेतीचा व्यासंग जपलेल्या मारेगाव...
व्यावसायिक दृष्टिकोनामुळेच यशस्वी...पुणे जिल्ह्यात अति पावसाच्या मावळ तालुक्यातील...
संयुक्त कुटुंबाचे शेती, पूरक उद्योगाचे...यशवंतवाडी (जि. लातूर) येथील पाच भाऊ व एकूण ४०...