जगात सर्वाधिक दूध उत्पादनाची टिमकी वाजविणाऱ्या आपल्या देशात मुळातच दुधाचे सेवन फारच कमी आहे.
अॅग्रो विशेष
मराठवाड्यातील बहुतांश धरणे तुडुंब
औरंगाबाद : यंदा जोरदार पावसामुळे मराठवाड्यातील बहुतांश धरणे तुडूंब आहेत. त्यामुळे यंदा रब्बी व उन्हाळी पिकांची आशा उंचावली आहे.
औरंगाबाद : यंदा जोरदार पावसामुळे मराठवाड्यातील बहुतांश धरणे तुडूंब आहेत. त्यामुळे यंदा रब्बी व उन्हाळी पिकांची आशा उंचावली आहे. सहा जिल्ह्यांतील ६७ मध्यम प्रकल्पात तसेच पाच जिल्ह्यातील ३९४ लघू प्रकल्पातही उपयुक्त पाणीसाठा ८० टक्क्यांपुढे असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.
मराठवाड्यातील ८७६ लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह नदीवरील बंधाऱ्यांमधील उपयुक्त पाणीसाठा ९३.६३ टक्के आहे. यामध्ये ११ मोठ्या प्रकल्पातील ९९.७५ टक्के, ७५ मध्यम प्रकल्पांमधील ९१.८१ टक्के, ७५२ लघू प्रकल्पांतील ७८.२९ टक्के, गोदावरी नदीवरील १३ बंधाऱ्यांमधील ८१.६६ टक्के, तर तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २५ बंधाऱ्यांमधील ९३.७४ टक्के उपयुक्त पाणीसाठ्याचा समावेश आहे.
मोठ्या ११ प्रकल्पांपैकी जवळपास सर्वच प्रकल्प तुडूंब आहेत. सात जिल्ह्यातील ७५ मध्यम प्रकल्पांपैकी औरंगाबादमधील १६, जालन्यातील ७, बीडमधील १६, लातूरमधील ८, उस्मानाबादमधील १७, नांदेडमधील ९, तर परभणीमधील २ प्रकल्पांत ९० टक्क्यांपेक्षा जास्त उपयुक्त पाणीसाठा आहे. या पैकी ४६ प्रकल्प तुडूंब आहेत. त्यामध्ये औरंगाबादमधील १०, जालना ५, बीड १२, लातूर २, उस्मानाबाद १२, नांदेड ४, तर परभणीमधील एका प्रकल्पाचा समावेश आहे.
गतवर्षी २० नोव्हेंबरअखेर मराठवाड्यातील ७५ मध्य प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा ५५ टक्के, तर २०१८ मध्ये केवळ १६ टक्केच शिल्लक होता. ७५२ लघू प्रकल्पांचा विचार करता बीडमधील १२६, लातूरमधील १३२, नांदेडमधील ८८, परभणीमधील २२ व हिंगोलीमधील २६ लघू प्रकल्पांत ८० टक्क्यांपुढे उपयुक्त पाणीसाठा आहे.
औरंगाबादमधील ९६ लघू प्रकल्पांत ७९ टक्के पाणी
गतवर्षी २० नोव्हेंबर अखेरपर्यंत मराठवाड्यातील ७५२ लघू प्रकल्पांत ४८ टक्,के तर २०१८ मध्ये केवळ १६ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. औरंगाबाद जिल्ह्यातील ९६ लघू प्रकल्पांत ७९ टक्के, तर जालना जिल्ह्यातील ५७ लघू प्रकल्पात ६७ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.