आंबोलीत सर्वाधिक पाऊस

आंबोलीत सर्वाधिक पाऊस
आंबोलीत सर्वाधिक पाऊस

सिंधुदुर्ग : राज्यात सर्वाधिक पाऊस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली (ता. सांवतवाडी) येथे झाला. या ठिकाणी पावसाची नोंद ८५७५ मिलिमीटर झाली. जिल्ह्यातील पावसाची वाटचाल विक्रमाकडे सुरू आहे. आतापर्यंत ४०८९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. अजूनही पावसाचा हंगाम शिल्लक आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांचा उच्चांक यंदा मोडण्याची शक्यता आहे.

सिंधुदुर्गात जूनच्या पहिल्या आठवड्यात मॉन्सूनचे आगमन होते. परंतु यावर्षी ते १५ जूननंतरच झाले. सुरवातीचे काही दिवसानंतर अखंडपणे पाऊस सुरू आहे. जुलैच्या अखेरच्या आठवड्यापासून ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. 

ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत चांगला पाऊस होतो. त्यानतंर नोव्हेंबरमध्ये परतीचा पाऊस देखील होतो. धबधब्यांमुळे राज्याच्या पर्यटन नकाशावर चमकणाऱ्या आंबोलीत राज्यातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. येथे सुमारे ८५७५  मि.मी. (३४३ इंच). इतका पाऊस झाल्याची माहिती पर्जन्यमापक भाऊ ओगले यांनी दिली. ४ ऑगस्टला या ठिकाणी तब्बल  ४२५ मि.मी पावसाची नोंद झाली.

दरवर्षी आंबोलीत ३०० इंच पाऊस होतो.परंतु यावर्षी सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात हा आकडा पावसाने पार केला आहे. या वर्षी महाबळेश्‍वरमध्येसुद्धा इतका पाऊस झाला नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com