पुण्यात बहुतांश भाजीपाल्यांचे दर स्थिर

पुण्यात बहुतांश भाजीपाल्यांचे दर स्थिर
पुण्यात बहुतांश भाजीपाल्यांचे दर स्थिर

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ३०) भाजीपाल्याची सुमारे १५० ट्रक आवक झाली हाेती. पितृपंधरवडा सुरू असूनदेखील भाजीपाल्याला उठाव नसल्याने बहुतांश भाजीपाल्यांचे दर स्थिर हाेते, तर पालेभाज्याच्या दरात वाढ झाली हाेती.

आवकेमध्ये परराज्यातून कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे ७ ट्रक कोबी, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून सुमारे २२ टेम्पो हिरवी मिरची, बंगळूर येथून २ टेंपो आले, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून ३ टेंपो शेवगा, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची साडेचार ते पाच हजार गोणी आवक झाली हाेती.

तर स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार ५०० पोती, टाेमॅटोे सुमारे ६ हजार क्रेट, फ्लॉवर १० तर काेबी सुमारे १५ टेंपो, गवार ८ टेंपो, भेंडी १२ टेंपो, ढोबळी मिरची १० टेंपो, हिरवी मिरची ८ टेंपो, मटार आणि भुईमूग शेंग प्रत्येकी २०० गोणी, पावटा ६ टेंपो, भुईमूग २०० पोती, गाजर ८ टेंपाे, श्रावणी घेवडा ३ टेंपाे, तांबडा भाेपळा १५ टेंपाे, कांदा सुमारे ७५ ट्रक, आग्रा, इंदौर आणि तळेगाव येथून बटाटा सुमारे ५० ट्रक आवक झाली हाेती.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव कांदा : ७०-११०, बटाटा : १४०-१८०, लसूण : १५०-३००, आले : सातारी : ५५०-६००, बंगलाेर ५००-५५०, भेंडी : १५०-२५० गवार : सुरती- १५०-३००, टोमॅटो : ५०-७०, दोडका : १००-१६० हिरवी मिरची : १५०-२५०, दुधी भोपळा : ४०-८०, चवळी : १५०-२००, काकडी : ८०-१२०, कारली : हिरवी १५०-१६०, पांढरी : १००-१२०, पापडी : १६०-१८०, पडवळ : १६०-१८०, फ्लॉवर : ६०-१००, कोबी : ३०-६०, वांगी : १००-२०० डिंगरी : १६०-१८०, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : १५०-२००, तोंडली : कळी २००-२५०, जाड : १००-११०, शेवगा : ३५०-४००, गाजर : १००-१२०, वालवर : २२०-२४०, बीट : ६०-८०, घेवडा : २५०-३००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २५०-३००, घोसावळे : १५०-२००, ढेमसे : २५०-३००, भुईमूग : २५०-३५०, पावटा : २००-३५०, मटार : ६५०-७००, तांबडा भोपळा : ४०-८०, सुरण : २२०-२४०, मका कणीस : ६०-८०, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर सुमारे दीड लाख, तर मेथी सुमारे ६० हजार जुड्या आवक झाली हाेती.

पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) कोथिंबीर : ५००-१२००, मेथी : ६००-१०००, शेपू : ५००-८००, कांदापात : ५००-८०० चाकवत : ५००-६००, करडई : ५००-६००, पुदिना : २००-३००, अंबाडी : ५००-७००, मुळे : ८००-१०००, राजगिरा : ५००-६००, चुका : ५००-६००, चवळई : ५००-८००, पालक : ५००-७००.

फळबाजार फळबाजारात रविवारी (ता. ३०) मोसंबी सुमारे १०० टन, संत्री ५० टन, डाळिंब सुमारे ३०० टन, पपई २० टेंपोे, लिंबे ४  हजार गोणी, चिकू ५०० बॉक्स आणि गाेणी, पेरू ३०० क्रेट, कलिंगड २० टेंपो, खरबूज ३ टेंपो, विविध जातींची बोरे सुमारे १५० गोणी, सीताफळ १० टन आवक झाली हाेती.

फळांचे दर पुढीलप्रमाणे लिंबे (प्रतिगोणी) : ३००-८००, मोसंबी : (३ डझन) : ९०-२२०, (४ डझन ) : २०-८०, संत्रा : (३ डझन) ८०-१८०, (४ डझन) : ३०-८०, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : २०-८०, गणेश १०-२५, आरक्ता १०-४०. कलिंगड : १०-२५, खरबूज : १०-४०, पपई  : ५-२०, चिक्कू : ५००-८००, पेरू (२० किलो) : ३५०-६००, सीताफळ : २०-१६०, सफरचंद - सिमला (२० ते २५ किलो) १५००-२३००, किन्नोर : (२५ किलो) २३००-३०००, काश्मीर डेलीशिअस : (१५ ते १६ किलो) ९००-१४००, बोरे : चेकनट (१ किलो) ५५-६०, उमराण (१० किलो) ८०-१००, चमेली (१० किलो) १८०-२००, चण्यामण्या ५५०-६००.

फूलबाजार पावसाची उघडीप आणि उष्णता वाढीमुळे फुलांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. परिणामी बाजारातील आवकदेखील वाढली अाहे, तर पितृपंधरवडा सुरू असल्याने विविध फुलांची मागणी घटली आहे.

फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे  झेंडू : ५-१०, गुलछडी : १०-२०, बिजली : ५-१५ कापरी : ५-१०, शेवंती १०-३०, ऑस्टर : २-४, गुलाबगड्डी (गड्डीचे भाव) : २-५, गुलछडी काडी : ५-२०, डच गुलाब (२० नग) : १०-३०, लिलिबंडल : ३-६, जर्बेरा : ५-१५, कार्नेशियन : २०-५०, चमेली : २००-३००, जुई : ३००-४००

मटण मासळी गणेशाेत्सव संपल्याने विविध मासळी आणि अंड्याच्या मागणीत वाढ झाली आहे. परिणामी मासळीच्या दरात २० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे, तर अंड्याच्या दरात शेकड्याला १५ ते ३० आणि चिकनच्या दरात २० रुपयांनी वाढ झाली आहे, तर मटणाचे दर स्थिर आहेत. गणेश पेठेतील मासळीच्या घाऊक बाजारात खोल समुद्रातील मासळी १० टन, खाडीची ५०० किलो, नदीची १ टन आवक झाली हाेती. तर आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून सुमारे १२ टन आवक झाल्याचे व्यापारी ठाकूर परदेशी यांनी सांगितले.   खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) पापलेट : कापरी : १४००-१५००, मोठे : १४००-१५०० , मध्यम : ८००-८५० लहान : ५५०-६००, भिला : ५००-५५०, हलवा : ४००-४८०, सुरमई : ४००-४८०, मोठे ६००, रावस-लहान : ५५०, मोठे ६५० घोळ : ४८०, करली : २४०, भिंग : १८०-२४०, पाला : ७००-८०० वाम : पिवळी लहान २४० मोठी ४००-४८०, काळी : २००, ओले बोंबील : लहान ५०-६०, मोठे १००-१२०.

कोळंबी ः लहान : २४०, मोठी : ३६०-४०० जंबोप्रॉन्स : १४००, किंगप्रॉन्स : ७५०, लॉबस्टर : १४००, मोरी : लहान १६०-१८०, मोठे २००-२४०, मांदेली : १००-१२० राणीमासा : १६०-१८० खेकडे : १६०-२००, चिंबोऱ्या : ४००-४४०.

खाडीची मासळी सौंदाळे : २००, खापी : १६०, नगली : लहान २०० मोठी ४००, तांबोशी : ३६०, पालू : २००, लेपा : लहान १२०, मोठे २००, शेवटे : लहान १२०-१४० मोठे २४० बांगडा : लहान १२०-१४० मोठा १६०-२०० ,पेडवी : ३०, बेळुंजी : १००, तिसऱ्या :१६० खुबे : १२०, तारली : १००-१२०.

नदीची मासळी रहू : १४०, कतला : १६०, मरळ : लहान २८०, मोठी ३६०, शिवडा : १४० चिलापी : ५०-६०, मागुर : ८०, खवली : १८०, आम्ळी : ८० खेकडे : १६०, वाम : ४००.

मटण : बोकडाचे : ४६०, बोल्हाईचे : ४६०, खिमा : ४६० कलेजी : ५००.

चिकन : १५०, लेगपीस : १८०, जिवंत कोंबडी : १२०, बोनलेस : २६०.

अंडी : गावरान : शेकडा : ६४०, डझन : ९० प्रतिनग : ७.५. इंग्लिश : शेकडा : ३७९ डझन : ६० प्रतिनग : ५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com