Agriculture News in Marathi Mostly dry weather forecast in the state | Agrowon

राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज 

टीम अॅग्रोवन
रविवार, 5 डिसेंबर 2021

राज्यात सुरू असलेल्या पावसाने उघडीप दिली असली, तरी दिवसभर आकाश ढगाळ राहत आहे. अनेक भागांत रात्री आणि पहाटे धुक्याची चादर पाहायला मिळत आहे.

पुणे : राज्यात सुरू असलेल्या पावसाने उघडीप दिली असली, तरी दिवसभर आकाश ढगाळ राहत आहे. अनेक भागांत रात्री आणि पहाटे धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. आज (ता. ५) कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असून, उर्वरित राज्यात हवामान मुख्यतः कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे. 

राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरू आहेत. ढगाळ हवामानामुळे कमाल तापमान कमी झाले आहे. तर किमान तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. राज्यात हळूहळू गारठा वाढण्याची शक्यता आहे. शनिवारी (ता. ४) मालेगाव येथे नीचांकी १४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अलिबाग येथे उच्चांकी ३२.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. शुक्रवारी (ता. ३) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. 

शनिवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (सौजन्य : हवामान विभाग) 
कोकण : संगमेश्‍वर ३०, राजापूर, माथेरान प्रत्येकी २०, वेंगुर्ला १०. 
मध्य महाराष्ट्र : राहुरी ५०, करमाळा, माढा, पंढरपूर, खंडाळा प्रत्येकी २०, मोहोळ, कर्जत प्रत्येकी १०. 
मराठवाडा : भूम ३०. 

शनिवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
पुणे २४.९ (१९.४), नगर - (२०), जळगाव २९.५ (१६), कोल्हापूर २८.१ (२०.४), महाबळेश्‍वर १९.९ (१४.९), मालेगाव २१ (१४), नाशिक २५.५ (१९.२), निफाड २८.२ (१८), सांगली २९.२ (१९.६), सातारा २७.७ (२१.३), सोलापूर ३०.२ (१८.६), सांताक्रूझ ३०.२ (२२.४), अलिबाग ३२.२ (-), डहाणू २९.२ (२१.३), रत्नागिरी ३०.५ (२३.४), औरंगाबाद २६.६ (१८.३), नांदेड २६.२ (१७.६), उस्मानाबाद - (१८), परभणी २५.३ (१७.५), अकोला २६.८ (१७.१), अमरावती २४.६ (१४.३), ब्रह्मपुरी ३१.३ (१५.४), बुलडाणा २८ (१६.२), चंद्रपूर २९.२ (१७.४), गडचिरोली ३० (१५), गोंदिया २८.८ (१५.२), नागपूर २६.६ (१७.०), वर्धा २७.४ (१६.८), वाशीम २१.५ (१४), यवतमाळ ३२ (१५).  


इतर अॅग्रो विशेष
महाराष्ट्रात ३५ धान्य आधारित इथेनॉल...वृत्तसेवा - केंद्र सरकारने (Central Government)...
रशियासाठी निर्यातीच्या द्राक्ष दराचा...पुणे - महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने...
गावरान कि ब्रॉयलर चवीला कोण जबरदस्त?कोंबडीची पचनसंस्था कशी कार्य करते. तुम्ही कोंबडी...
थंडीत खा अंडी रोज सकाळी उठल्यावर कसला नाष्टा करावा जो कि...
गुणवत्तापूर्ण आंब्याला मिळवली ग्राहक...मालगुंड (ता. जि. रत्नागिरी) येथील विद्याधर...
ट्रायकोडर्मा निर्मितीसाठी शेतात उभारली...राहुल रसाळ यांनी शेत परिसरात छोटेखानी प्रयोगशाळा...
टिळा तेजाचामराठी भाषेला मातीतल्या कवितेचे लेणं चढवणाऱ्या कवी...
शेळ्यांसाठी शेंगवर्गीय चारा पिक शेळ्यांचा सर्वांत आवडता आहार म्हणजे झाडाचा पाला....
सोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...मराठवाडा कापूस बाजारभाव - आज किनवट बाजारात...
जनावरांमध्ये अचानक गर्भपात का होतो?या रोगाचा प्रसार प्रामुख्याने गवत, पिण्याचे पाणी...
सहकाराला मारक कायदे बदलण्याला प्राधान्य राज्यातील सहकारी बॅंकिंग व्यवस्थेचे अभ्यासक...
पंजाबात मोहरीच्या क्षेत्रात वाढ, मात्र...वृत्तसेवा - पंजाबमध्ये मोहरीची लागवड ३३ हजार...
‘जुनं ते सोनं' चा खोटेपणा "जुनी शेती खूप चांगली होती. त्या शेतीत खूप...
उन्हाचा चटका वाढला, गारठा ओसरला पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असल्याने...
साखर कारखान्यांच्या माल तारण  कर्जावरील...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या माल तारण...
खते मुबलक; पण किंमत जादा पुणे : राज्यात रब्बी हंगामात रासायनिक खतांची...
ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील...कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, माजी...
सोयापेंडीच्या मागणीमुळे सोयाबीनचे दर...पुणे ः बाजारात सध्या सोयाबीन दर एका भावपातळीवर...
कांदाच बनला टुमदार बंगल्याची ओळख नाशिक ः  या नभाने या भुईला दान...
कापूस आयात शुल्क  रद्दच्या विषयावरील...जळगाव ः कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यासह वायदा...