घोटभर पाणी बेतले मायलेकीच्या जिवावर

पिण्यासाठी पाणी काढताना शेततळ्यात पाय घसरून पडल्याने मायलेकीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना अंजनगाव (ता. बारामती) येथे घडली. पाण्यात पडलेल्या तिघींपैकी एक मुलगी सुदैवाने बचावली. त्यामुळे हा दुर्दैवी प्रकार उघडकीस आला.
A lot of water was poured on Mileki's soul
A lot of water was poured on Mileki's soul

उंडवडी, जि. पुणे :  पिण्यासाठी पाणी काढताना शेततळ्यात पाय घसरून पडल्याने मायलेकीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना अंजनगाव (ता. बारामती) येथे घडली. पाण्यात पडलेल्या तिघींपैकी एक मुलगी सुदैवाने बचावली. त्यामुळे हा दुर्दैवी प्रकार उघडकीस आला. 

आश्‍विनी सुरेश लावंड (वय ३६), समृद्धी सुरेश लावंड (वय १५) अशी या घटनेत मृत्यू झालेल्या मायलेकीची नावे आहेत. तर या घटनेत बचावलेल्या मुलीचे नाव श्रावणी सुरेश लावंड (वय १२) असे नाव आहे.

मंगळवारी (ता. १४) दुपारी चारच्या दरम्यान ही घटना घडली. याबाबत मिळालेली माहिती अशी, की येथील आश्‍विनी या आपल्या दोन मुलींसह शेतात शेळ्या चारण्यासाठी गेल्या होत्या. तिघींना तहान लागल्यानंतर त्या गट नंबर ९० मधील येथील शेतकरी मेमाणे यांच्या पाण्याने तुडुंब भरलेल्या शेततळ्यात पाणी काढण्यासाठी बाटली घेऊन उतरल्या होत्या. या वेळी समृद्धी शेततळ्यात बाटलीत पाणी भरताना पाय घसरून पडली.  

मुलीला वाचविण्यासाठी आई -(आश्‍विनी) यांनी प्रयत्न केला. त्यांचाही पाय घसरला आणि दोघी पाण्यात पडल्या. त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करणारी तिसरी मुलगी श्रावणीदेखील पाण्यात पडली. तिघीही पाण्यात बुडाल्या. मात्र श्रावणी शेततळ्याच्या प्लॅस्टिक कागदाला धरून बाहेर पडली आणि तिने आरडाओरडा केल्याने हा प्रकार स्थानिक लोकांच्या लक्षात आला. मात्र ग्रामस्थ जमा होण्यापूर्वीच आश्‍विनी आणि समृद्धी या मायलेकीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. 

घटनेची माहिती मिळताच पोलिस पाटील ईश्‍वर खोमणे हे घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी घटनेची माहिती तालुका पोलिसांना दिली. त्यानंतर लागलीच बारामती पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक योगेश लंगोटे आणि त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर मृतदेह शेततळ्यातून बाहेर काढण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com