agriculture news in Marathi, Mother Dairy directed for make puree from tomato, Maharashtra | Agrowon

टोमॅटोची प्युरी विकण्याची मदर डेअरीला सूचना
टीम अॅग्रोवन
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

नवी दिल्ली : टोमॅटोचे दर वधारताच केंद्र सरकारने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी मदर डेअरीला टोमॅटोची प्युरीची तत्काळ उपलब्धता करून विकण्याची सूचना केली आहे. याशिवाय दिल्ली सरकारलाही टोमॅटोची साठेबाजी आणि सीमेवरील वाहतूक दिरंगाईवर नजर ठेवण्यास आणि तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.  

नवी दिल्ली : टोमॅटोचे दर वधारताच केंद्र सरकारने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी मदर डेअरीला टोमॅटोची प्युरीची तत्काळ उपलब्धता करून विकण्याची सूचना केली आहे. याशिवाय दिल्ली सरकारलाही टोमॅटोची साठेबाजी आणि सीमेवरील वाहतूक दिरंगाईवर नजर ठेवण्यास आणि तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.  

केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे सचिव अविनाश के. श्रीवास्तवा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या आंतर मंत्रिस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अत्यंत नाशवंत भाजीपाला असलेल्या टोमॅटोचे दर आणि बाजार पेठेतील पुरवठ्याचा आढावा गुरुवारी (ता. १०) घेण्यात आला. दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी विभागात (एनसीआर) येथे किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर ८० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोचले आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील मुसळधार पावसामुळे टोमॅटोच्या पुरवठ्यात अडथळा निर्माण झाला आहे. सर्वसाधारणपणे देशात २० दशलक्ष टन टोमॅटोचे वर्षभरात उत्पादन घेतले जाते.  

खासगी व्यापार माहितीनुसार दिल्लीत टोमॅटोचे दर प्रतवारीनुसार ६० ते ८० रुपये प्रति किलो दरम्यान आहेत, तर सरकार माहितीनुसार ६० रुपये प्रतिकिलो दर आहे. केंद्र सरकारच्या आवाहनंतर मदर डेअरी संचालित दिल्लीतील सर्वच ‘सफल’ आऊटलेटस्‌मध्ये टोमॅटोची प्युरी विकण्यास मान्यता देण्यात आली आहे.

येत्या दहा दिवसांत महाराष्ट्र आणि कर्नाटकात पावसाचे प्रमाण कमी होताच, टोमॅटोचा पुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. दर नियंत्रणासाठी तुटवडा भासणाऱ्या राज्यात टोमॅटो उत्पादक राज्यांनी पुरवठा करण्याचे आवाहन केंद्र सरकारतर्फे करण्यात आले आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेश या पुरवठादार राज्यांना बाजार समित्या, व्यापारी आणि वाहतूकदारांबरोबर नियमित संवाद साधण्यच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.

टोमॅटो प्युरीची विक्री सुरू
टोमॅटो प्युरीची विक्री प्रति २०० (८०० ग्रॅम टोमॅटोपासून २०० ग्रॅम प्युरीची निर्मिती होते) ग्रॅमला २५ रुपये, तर ८२५ (अडीच किलो टोमॅटोच्या बरोबर) ग्रॅमला ८५ रुपये असणार आहे. दिल्लीत मदर डेअरीचे ४०० आऊटलेट्स आहेत. येथे प्युरी उपलब्ध करण्यात आली असून, शुक्रवार (ता. ११) पासून विक्रीही सुरू झाली आहे.   
 

इतर अॅग्रो विशेष
महाबळेश्वरात स्ट्रॉबेरी लागवडीस वेगसातारा  ः जिल्ह्यातील महाबळेश्वर, जावळी, वाई...
संत्र्याच्या आंबिया बहराला गळती; भाव...अकोला : संत्र्याच्या आंबिया बहाराला गळती...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे ः परतीचा मॉन्सून देशातून परतल्यानंतर...
दुधाचे थकीत अनुदान देण्याच्या हालचालीपुणे: राज्यातील डेअरी उद्योगांचे अडकलेले...
अमरावती विभागात सोयाबीन उत्पादकता घटलीअमरावती  ः गेल्या काही वर्षांत कापसाला...
‘महाॲग्री ते महाॲग्रीटेक’ एक स्वप्नरंजन राज्यात शेतकऱ्यांची सर्व कामे ऑनलाईन होतील असे एक...
शेण पावडरपासून कलात्मक वस्तूंची...सुमारे ३८ देशी गायींचे संगोपन करीत नागपूर येथील...
शेततळ्यातील पाण्यावर फुलले शेडनेटमधील...पावसाचे कायम दुर्भिक्ष, त्यामुळे शेती अर्थकारणाला...
राज्यात गाजर ११०० ते ८००० रुपये...जळगावात ११०० ते १८०० रुपये दर जळगाव कृषी...
ऋतुचक्र बदलया वर्षीचा मॉन्सून अनेक बाबींनी वैशिष्ट्यपूर्ण...
प्रतिष्ठेचं वलय होतंय द्राक्ष...द्राक्ष शेतीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय...
उडीद, मूग, सोयाबीन ऑनलाइन नोंदणीला...औरंगाबाद: हमीदराने उडीद, मूग, सोयाबीन...
सांगली जिल्ह्यात डाळिंबावर रसशोषक...सांगली : मृग हंगाम धरलेल्या बहाराच्या डाळिंबाच्या...
कडधान्य आयातीला मुदतवाढीचा प्रस्तावनवी दिल्लीः देशात यंदा खरिप काडधान्य पिकांची...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे: वाढलेल्या उन्हामुळे राज्यात चटका वाढला आहे...
परतीचा मॉन्सून आठ दिवसात माघारीपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
आदर्श वनसंवर्धनातून ग्रामविकास साधलेले...वनसंपत्तीचे संवर्धन, वनविकासासह शेतीतही दिशादर्शक...
येतो मी... मॉन्सूनने घेतला देशाचा निरोप...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी...
शेतकऱ्यांच्याच कपाळावर पुन्हा ‘मिऱ्या’दिनांक ३ जुलै २०१९ रोजी केरळचे खासदार डीन...
आश्वासनांचा पाऊसराज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम...