दहा नोव्हेंबरनंतर कारखाने सुरू करण्याच्या हालचाली

दहा नोव्हेंबरनंतर कारखाने सुरू करण्याच्या हालचाली
दहा नोव्हेंबरनंतर कारखाने सुरू करण्याच्या हालचाली

कोल्हापूर: सध्या जिल्ह्यातील  साखर कारखाने ठप्प असले तरी पुढील सप्ताहाच्या प्रारंभी हंगाम सुरू करण्याच्या हालचाली कारखानदारांनी सुरू केल्या आहेत. शनिवारी (ता. १०) कारखानदारांची बैठक होणार असून यातूनच चर्चा होऊन भूमिका जाहीर होण्याची शक्‍यता आहे.  शेतकरी संघटनांनी आंदोलन पुकारल्याने कारखानदारांनी हिंसक घटना टाळण्याकरिता हंगाम बंद ठेवला होता. साखरेचे दर फारसे वाढले नसल्याचे कारण देत सरकारनेही ठोस काहीतरी केल्याशिवाय कारखाने सुरू करणार नाही अशी भूमिका घेतली होती. पण, कारखाने जादा वेळ बंद राहू शकणार नाहीत अशी स्थिती सध्या शिवारात आहे. अनेक कारखान्यांचे बहुतांशी मजूर दाखल झाले आहेत. तोडी बंद असल्याने या मजुरांना काम नाही. तोडणी मजुरांची रोजी रोटी उसाचे वाडे विकून मिळणाऱ्या पैशावर चालते. यामुळे सध्या दररोज खर्चाला रक्कम कुठून आणायची अशी विचारणा मजुरांकडून होत आहे.  दिवाळी झाल्या झाल्या कारखान्यांनी करारबद्ध केलेले बहुतांशी मजूर कारखाना स्थळावर दाखल होणार असल्याने या मजुरांना केवळ आणून ठेवणे कारखान्यांना परवडणारे नाही. यामुळे दहा नोव्हेंबरनंतर कोणत्याही परिस्थितीत तोडगा निघण्यासाठी गती येईल अशी शक्‍यता आहे. या कामी मुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांनी कारखानदारांना हमी दिल्यास सकारात्मक वातावरण तयार होईल या दृष्टीने शेतकरी संघटनांचीही समजूत काढून त्यांना आंदोलन मागे घेण्याबाबत चर्चा करण्याबाबतही चर्चा सुरू आहे. शेतकरी संघटनांनाही अद्यापही कोणतीच भूमिका जाहीर केली नाही. यामुळे हंगाम सुरू करण्याबाबत दहा नोव्हेंबरनंतरच सुरू हालचाली गतीमान होण्याची चिन्हे आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com