कांदा प्रतवारी यंत्रनिर्मितीसाठी सामंजस्य करार

कांदा प्रतवारी यंत्रनिर्मितीसाठी करार
कांदा प्रतवारी यंत्रनिर्मितीसाठी करार

अकोला  : कांदा प्रतवारी यंत्राची निर्मिती करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अाणि अभियांत्रिकी शैक्षणिक संस्था यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात अाला अाहे. या करारामुळे अागामी काळात कांदा प्रतवारीचे काम सुलभ पद्धतीने करणारी यंत्रे शेतकऱ्यांना उपलब्ध होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत अाहे.  

शेतकऱ्यांना कांदा प्रतवारी करणे कठीण जाते. त्यामुळे प्रतवारी यंत्राची गरज लक्षात घेत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी सुधारित कांदा प्रतवारी यंत्राची निर्मिती केली आहे. यानंतर अाता हे यंत्र मोठ्या प्रमाणात  बनविण्यासाठी अभियांत्रिकी शैक्षणिक संस्थांसोबत कृषी विद्यापीठाने सामंजस्य करार केला आहे.

या वेळी कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले,  संशोधन संचालक डॉ. व्ही. के. खर्चे, कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ. महेंद्र नागदेवे, कुलसचिव डॉ. प्रकाश कडू, संशोधन अभियंता डॉ. प्रदीप बोरकर, डॉ. धनराज उंदिरवाडे, डॉ. प्रमोद वाकळे, डॉ. गुप्ता, डॉ. राऊत, सिपना अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ. एस. व्ही. रोडे, डॉ. सौ. व्ही. के. शांडिल्य (मुंजे), डॉ. व्ही. ए. गुल्हाने, संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ. जी. एस. गावंडे, विकास भांगडिया, विलास अनासाने अादी उपस्थित होते.

प्रास्ताविकात डॉ. नागदेवे यांनी कृषी विद्यापीठाच्या कापणीपश्चात अभियांत्रिकी संशोधन विभागाने विविध प्रक्रिया उपकरणे, यंत्रे विकसित केलेली असून, आतापर्यंत २५ खासगी यंत्रनिर्मात्यांसोबत सामंजस्य करार केल्याची माहिती दिली.

डॉ. भाले म्हणाले, की या कराराच्या माध्यमातून शेतकरी व विद्यार्थ्यांना फायदा होईल. कृषी यांत्रिकीकरण, कृषी प्रक्रिया, संगणक प्रणाली, स्वयंचलित कृषी प्रणालीचा उपयोग करून शेतीमध्ये दुसरी हरितक्रांती होऊ शकते. वासुदेव मते यांनी सूत्रसंचालन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com