agriculture news in marathi Mountain of crop insurance complaints in Parbhani district | Page 2 ||| Agrowon

परभणी जिल्ह्यात पीकविमा तक्रारींचा डोंगर

टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 जुलै 2021

परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत टोल फ्री क्रमांक, ऑनलाईन तसेच क्रॉप इन्सूरन्स अॅपव्दारे तक्रार दावे दाखल करण्याची सुविधा कुचकामी ठरत आहे.

परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत टोल फ्री क्रमांक, ऑनलाईन तसेच क्रॉप इन्सूरन्स अॅपव्दारे तक्रार दावे दाखल करण्याची सुविधा कुचकामी ठरत आहे. जिल्हास्तरावर कार्यालय आहे. परंतु तालुक्याचा भार एकाच कर्मचाऱ्यावर आहे. विमा दाव्याबाबत स्थानिक पातळीवर अपेक्षित सेवा मिळत नाहीत. अनेक शेतकरी थेट कृषी आयुक्तालयात जाऊन दाद मागत आहेत. परंतु अनेक शेतकऱ्यांना ते शक्य नसल्याने विमा भरपाईपासून वंचित राहत आहेत. विमा कंपनीच्या कार्यप्रणालीबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

गेल्या दोन वर्षांपासून परभणी जिल्ह्यात रिलायन्स जनरल इंसूरन्स कंपनीकडून पीकविमा योजना राबविली जात आहे. कृषी विभागातर्फे विमा कंपनीच्या तालुका प्रतिनिधींचे संपर्क क्रमांक विविध माध्यमातून प्रसारित केले आहेत. परंतु अनेक शेतकऱ्यांना त्याबाबत माहिती  नाही. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय परिसरात विमा कंपनीचे कार्यालय आहे. परंतु त्याठिकाणी दर्शनी भागात ठळक अक्षरात कार्यालयाचा फलक लावण्यात आलेला नाही.

शेतकऱ्यांना कार्यालय शोधत फिरावे लागते. अनेक शेतकऱ्यांना जिल्हा कार्यालयाबाबत माहिती नाही. या विमा कंपनीच्या कार्यप्रणालीबाबत गेल्या वर्षीचा तसेच त्याआधीचे शेतकऱ्यांचे अनुभव फारसे चांगले नाहीत. गतवर्षीचे प्रलंबित दावे. चालू वर्षीच्या तक्रार दाखल करण्यासाठी शेतकरी येतात. परंतु त्यांना समाधानकारक उत्तरे दिली जात नाहीत. 

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासही आवश्यक ती माहिती वेळेवर सादर केली जात नाही. स्थानिक पातळीवर दावे तक्रारी निघत नसल्याने अनेक शेतकरी, शेतकऱ्यांच्या संघटनांचे पदाधिकाऱ्यांना थेट कृषी आयुक्तलयात जाऊन दाद मागावी लागते. कृषी विभागाकडून नेहमीच विहित वेळेत तक्रार दावे दाखल करण्याचे आवाहन केले जाते. परंतु स्थानिक आपत्ती अंतर्गंत पीकनुकसानीची पूर्वसूचना देण्यासाठीचा कंपनीच्या १८०० १०२ ४०८८ हा टोल फ्री क्रमांकांवर किंवा भारत सरकारच्या १८०० १८० १५५१ या संपर्क करणाऱ्या शेतकऱ्यांना नेहमी प्रतिक्षा करावी लागते. विमा कंपनीच्या www.reliancegeneral.co.in किंवा राष्ट्रीय पीक विमा योजनेच्या www.pmfby.gov.in संकेतस्थळावर इंटरनेटअभावी विहित मुदतीत वेळेवर ऑनलाइन तक्रारी करता येत नाहीत. क्रॉप इन्सूरंन्स अॅपवर ओटीपी येण्यास विलंब लागत आहे. ७२ तासांच्या आत पूर्वसूचना देण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. 

कपंनीच्या प्रतिनिधींची अरेरावी

शेतकऱ्यांना तालुक्यास जाऊन तक्रार देण्यासाठी वेळ लागतो. प्रवास भाड्याचा भुर्दंड सोसावा लागतो. नुकसान दावे सादर करतेवेळी शेतकऱ्यांना कर्मचाऱ्यांकडून योग्य वागणूक मिळत नाही. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कुणाचाही धाक नसल्याचे चित्र आहे.

स्थानिक आपत्तीनंतर विविध कारणांनी ऑनलाइन दावे दाखल करता येत नाहीत. ऑफलाइन दावे स्वीकारण्यासाठी कंपनीकडे पुरेशी कर्मचारी व्यवस्था नाही. ऑफलाइन दाव्यास थोडा जरी विलंब झाल्यास नाकारतात. गतवर्षीचे दावे अजून प्रलंबित आहेत. कंपनीच्या मुजोरीला शेतकरी कंटाळले आहेत.
- विश्वंभर गोरवे, तालुकाध्यक्ष, शेतकरी संघटना, सोनपेठ, जि. परभणी.

विमा कंपनी तालुका प्रतिनिधींचा तपशील

तालुका  प्रतिनिधीचे नाव संपर्क क्रमांक
परभणी विठ्ठल खुळे ९७६६८६६८००
जिंतूर साईनाथ खुळे ९८५०५८७६०२
सेलू  विनोद झाडे ८८३०४११४१५
मानवत स्वप्निल हर्णे ८८५७००५२०१
पाथरी  गजानन शिंदे ९९७०११३६१४
सोनपेठ शेख जहिर ९५९५२५९६६४
गंगाखेड विठ्ठल मोरे  ७७१९९७८४३२
पालम विलास काळे ८८०६७४४०४२
पूर्णा  श्यामसुंदर खुळे ९३०७२०४२६४

 


इतर बातम्या
सौरऊर्जा पंप योजनेचे संकेतस्थळ डाउनऔरंगाबाद : सौरऊर्जेद्वारे कृषिपंप...
मराठवाड्यात पाऊस सुरूच; सोयाबीन, कपाशी...औरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा कमी अधिक प्रमाणात...
तंत्रज्ञान प्रसारामध्ये ‘केव्हीके’चा...सोलापूर ः ‘‘तंत्रज्ञान प्रसारामध्ये सोलापूर कृषी...
बंगालच्या उपसागरात घोंघावतेय चक्रीवादळपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
बांगलादेशला रेल्वेद्वारे होणार संत्रा...नागपूर : किसान रेल्वेच्या माध्यमातून संत्रा...
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...
राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारापुणे : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी...
सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिव्यांची  ५६...कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात  पावसाची उघडीप पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने अनेक...
यंदा भाताचे उत्पादन वाढण्याची शक्यताकोल्हापूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशात...
शेतीला सोलर कुंपण घाला यवतमाळ : वन्य प्राण्यांमुळे ज्या भागात नियमितपणे...
सततच्या पावसामुळे  रिसोडमध्ये सोयाबीन...रिसोड, जि. वाशीम : तालुक्यात २० सप्टेंबरपासून सतत...
प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ मिळाले,...औरंगाबाद : गतवर्षीच्या रब्बी हंगामात आयोजित...
  सांगली जिल्हा बँकेच्या  चौकशीला...सागंली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहकार कायदा...
खरीप हंगाम काढणीवर  पावसाचे गडद सावट नांदुरा, जि. वाशीम : खरीप हंगामातील पिके...
४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज...औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे...
खानदेशात प्रशासनाकडून रब्बीतील पीककर्ज...जळगाव  : खानदेशात रब्बी पीककर्ज वितरणाची...
मराठवाड्यात पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यात गुरुवारी (ता. २३)...