राज्यात मोसंबी प्रतिक्विंटल १५०० ते ५००० रुपये

बाग उक्ती देण्यावर शेतकऱ्यांचा भर असतो. मी सुद्धा २० ते २२ एकरातील मोसंबी ठोक दिली. शेतकऱ्यांकडे केवळ १० टक्के बागेत माल शिल्लक आहे. दर ३० ते ४५ हजार प्रति टनापर्यंत राहताहेत. व्यापाऱ्यांनी यंदा अलीकडे बऱ्यापैकी दर मोजून मोसंबीची खरेदी केली. - मुरलीधर चौधरी, शेतकरी, गारखेडा, ता. जि. औरंगाबाद
मोसंबी
मोसंबी

पुणे ः राज्यातील बाजार समित्यांमध्ये मोसंबीची आवक कमीच होत आहे. त्यामुळे मोसंबीला १५०० ते ७२०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळात आहे. सध्या सोलापूर, औरंगाबाद आणि सांगली येथील बाजारांत मोसंबीला कमाल दर ५००० रुपये मिळत आहे. 

अकोल्यात ३००० ते ५००० रुपये येथील बाजारात मोसंबीचा दर तीन ते पाच हजार रुपये क्विंटलला मिळत अाहे. अाठवड्यात २० क्विंटलपर्यंत अावक होत असल्याचे व्यापारी सूत्राने सांगितले. सध्या बुलडाणा जिल्ह्यासह जालना भागातून मोसंबीची अावक होत असते. सध्या ही अावक अाठवड्याला जेमतेम १५ ते २० किंटलपर्यंत अाहे. गेल्या अाठवड्यात मोसंबीचा दर २००० ते ४००० दरम्यान होता. मात्र अद्याप अपेक्षित मोसंबी विक्रीसाठी अालेली नाही. चांगल्या दर्जाच्या मालाला क्विंटलला पाच हजारांपर्यंत दर अाहेत. 

सोलापुरात २००० ते २५०० रुपये सोलापूर बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात मोसंबीची आवक तुलनेने कमी झाली, पण मागणी चांगली असल्याने दर काहीसे स्थिर राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. मोसंबीला प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये दर मिळाला. मुळात सोलापूर जिल्ह्यात मोसंबीचे उत्पादन खूपच कमी आहे. मोसंबीची सर्वाधिक आवक नजीकच्या उस्मानाबाद, लातूर भागांतून होते. त्याशिवाय कर्नाटकातूनही काही प्रमाणात होते. गेल्या आठवड्यात मोसंबीची आवक प्रतिदिन एक ते दीड टनापर्यंत होती, त्या आधीच्या सप्ताहात हीच आवक केवळ ५०० किलोपर्यंत होती, तर आधीच्या सप्ताहात ती दोन टनांपर्यंत राहिली. मोसंबीला या सप्ताहात प्रतिदहा किलोसाठी १५० ते २५० व सरासरी २०० रुपये दर मिळाला. त्या आधीच्या सप्ताहात हाच दर ३०० रुपये आणि त्या आधीच्या सप्ताहात ३५० रुपयांवर होता.

औरंगाबादेत ३००० ते ५००० रुपये येथील बाजार समितीमध्ये जसजशी मोसंबीची आवक घटली तसतशी दरात तेजी आल्याचे चित्र आहे. मंगळवारी (ता. ५) १३ क्‍विंटल आवक झालेल्या मोसंबीला ३००० ते ५००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. औरंगाबाद बाजार समितीमध्ये गत महिनाभराच्या आवक व दर आढाव्यात आवकेत चढ-उतार पाहायला मिळाला. ६ नोव्हेंबर १०३ क्विंटल आवक तर दर १८०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल होता. १३ नोव्हेंबरला १९ क्विंटल आवक होऊन ३००० ते ४००० रुपये दर मिळाला. २० नोव्हेंबरला आवक ३४ क्विंटल तर दर १५०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल होता. २७ नोव्हेंबरला २८ क्विंटल आवक होऊन २००० ते ४००० रुपये दर मिळाला. १ डिसेंबरला आवक ३९ क्विंटल तर दर २००० ते ३००० रुपये मिळाला.

जळगावात २००० ते ४००० रुपये येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फक्त दर शनिवारी मोसंबीची आवक होते. महिनाभरात आवक कमी अधिक अशीच राहिली. जिल्ह्यात मोसंबीची फारशी लागवड नाही. भडगाव, जळगाव, पाचोरा, पारोळा, चाळीसगाव भागांत किरकोळ लागवड झाली आहे. परंतु बुलडाणा, सिल्लोड, फुलंब्री (जि. औरंगाबाद) येथून आवक होते. आवक कमी असल्याने दर महिनाभरापासून टिकून आहेत. २ डिसेंबरला १५ क्विंटल आवक होऊन त्यास २००० ते ४००० रुपये दर मिळाला. २५ नोव्हेंबरला १५ क्विंटल आवक, तर दर २००० ते ३५०० रुपये होता. १८ नोव्हेंबरला आवक १५ क्विंटल होऊन १५०० ते ३५०० रुपये दर मिळाला. 

परभणीत २००० ते ४००० रुपये  येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत फळे भाजीपाला मार्केटमध्ये मोसंबीचे दर प्रतिक्विंटल २००० ते ४००० रुपये असल्याची माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. सध्या जालना जिल्ह्यातून मोसंबीची आवक होत आहे. गेल्या महिन्यात दररोज सरासरी २० ते २५ क्विंटल आवक झाली होती. त्या वेळी मोसंबीस प्रतिक्विंटल २००० ते ३५०० रुपये दर मिळाले होते. चालू महिन्यात आवक कमी झाली असून, एक-दोन दिवसआड मोसंबीची आवक होत आहे. शनिवारी (ता. २) १४ क्विंटल आवक झाली असताना प्रतिक्विंटल २००० ते ४००० रुपये दर मिळाले, असे व्यापारी शेख सलिम यांनी सांगितले.

नाशिकमध्ये १५०० ते ३५०० रुपये येथील बाजार समितीत बुधवारी (ता. ६) मोसंबीची १०० क्विंटल आवक झाली. या वेळी प्रतिक्विंटलला १५०० ते ३५०० व सरासरी २६०० रुपये दर निघाले. नाशिक बाजार समितीच्या पेठ रोड येथील फळ विभागात मोसंबीची आवक होते. नाशिक जिल्ह्यात मोसंबीचे उत्पादन होत नाही. नागपूर येथून मोसंबीची आवक होते. मागील महिन्यापासून मोसंबीच्या आवकेत निम्म्याहून अधिक घट झाली आहे. थंडीच्या कालावधीत मोसंबीला मागणी स्थिर असते. अजून २ महिने तरी सध्याची आवक व दर स्थिर राहतील असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. 

नागपुरात २७०० ते ३२०० रुपये नागपुरात मोठ्या आकाराच्या मोसंबी फळांनाही मागणी आहे. परंतु या वर्षी आंबीया बहरातील मोसंबीला वातावरणातील बदलाचा फटका बसल्याने फळगळ अधिक झाली. बाजारात मागणी अधिक आणि आवक कमी असल्याने दरात तेजी आली आहे. कळमणा बाजार समितीत मोसंबीची दर गेल्या महिनाभरापासून स्थिर आहेत. २७०० ते ३२०० रुपये प्रतिक्‍विंटलने मोसंबीचे व्यवहार होत असून ८०० क्‍विंटलची सरासरी आवक आहे. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील नरखेड, काटोलचा काही परिसर या भागातच मोसंबीची थोडीफार लागवड आहे. परंतु या भागातील मोसंबीची गळ झाल्याने मोसंबीची सर्वाधिक लागवड असलेल्या मराठवाड्याच्या औरंगाबाद, जालना, नांदेड भागांतून आवक वाढली आहे. 

कोल्हापुरात १५०० ते ३९०० रुपये येथील बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून मोसंबीच्या आवकेत घट झाल्याने दर काहीसे तेजीत असलेल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. ६ डिसेंबरला मोसंबीची ६९ क्विंटल आवक होऊन क्विंटलला १८०० ते ३९०० रुपये दर मिळत आहे. नागपूर, औरंगाबाद जिल्ह्यातून मोसंबीची आवक होते. बाजार समितीत आलेल्या मोसंबीची रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोव्यामध्ये विक्री होते. अद्यापही मोसंबीची हवी तशी आवक नसल्याने मोसंबीचे दर तेजीत आहेत. २९ नोव्हेंबरला ८२ क्विंटल आवक होऊन १९०० ते ३८०० रुपये दर मिळाला. २२ नोव्हेंबरला ६० क्विंटल आवक होऊन १७०० ते ३३०० रुपये दर मिळाला. 

सांगलीत ३००० ते ५००० रुपये  येथील विष्णूअण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवारात मोसंबीची आवक कमी-अधिक प्रमाणात होत आहे. बुधवारी (ता. ६) मोसंबीची ४८ डझन आवक झाली होती. तीस प्रतिक्विंटल ३००० ते ५००० रुपये असा दर मिळाला. अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. अहमदनगर जिल्ह्यातून येथील बाजार समितीत मोठ्या प्रमाणात मोसंबीची आवक होते. गेल्या महिन्याभरात मोसंबीची आवक कमी-अधिक होत असून, त्याचे दर स्थिर आहेत. मोसंबीची पुढील सप्ताहात दर वाढण्याची शक्‍यता अशी माहिती व्यापारी वर्गांनी दिली. मागील हंगामात डिसेंबर २०१५ ते मार्च २०१६ मध्ये मिळालेले दर (प्रतिक्विंटल/रुपये)

बाजार समिती डिसेंबर     जानेवारी     फेब्रुवारी     मार्च
औरंगाबाद     ३१६१     २०६८     १९२२     २६०६
जळगाव     ३०६६     २४५८     २५१०     २५१०
कोल्हापूर     ३७४०     २९६०     ४६४७     ३२३०
मुंबई     २०६७     १६५४     १६२८     १७३२
नागपूर     १७०७     १७०७     १७१२     १७५०
नाशिक     ३०५४     १९८१     १९३३     २१६७
सांगली     २५२१     २५००     २५५०     २५१५
सातारा     ५७४१     ६३६३     ६३००     ६३००

देशातील महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये ६ डिसेंबर रोजी झालेली आवक व दर (प्रतिक्विंटल/रुपये)

बाजार समिती आवक     किमान     कमाल
कांग्रा (हिमाचल प्रदेश)  ७०     ४०००     ४१००
मालौत (पंजाब)   २०     ४०००     ४५००
सुनामा (पंजाब) ५०     ५०००     ५५००
अकबरपूर (उत्तर प्रदेश)   १५०     ३१७५     ३२२५
गोरखपूर (उत्तर प्रदेश) ७५०     २८५०     ३०००
खैरागड (उत्तर प्रदेश) ३००     २९८०     ३०२०

       प्रतिक्रिया बाजार समितीमध्ये मोसंबीचे दर टिकून असले तरी कमाल दर फक्त दर्जेदार मोसंबीला मिळतात. आवक कमी होत असल्याने लिलाव लागलीच होतो. पैसेही रोखीने मिळतात. - रमेश पाटील, शेतकरी, केऱ्हाळे, ता. रावेर, जि. जळगाव

सध्या बाजारात १० ते १५ गाड्या आंबीया बहरातील मोंसबीची आवक आहे. आंबीया बहरातील मोसंबीला ३५ ते ४० हजार रुपये टन असा उच्चांकी दर मिळत आहे. तापमानातील वाढ व इतर कारणांमुळे या वर्षी विदर्भात आंबीया बहरातील उत्पादन कमी झाले आहे.  - प्रवीण मधोरिया, मोसंबी व्यापारी, कळमणा बाजार समिती, नागपूर.

मार्च महिन्यात तापमानात वाढ झाल्याने या वर्षी आंबीया बहरातील मोसंबीची गळ अधिक झाली. त्यासोबतच पाणीटंचाईचाही फटका बसला. त्यामुळे या वर्षी उत्पादन कमी झाल्याने दरात तेजी आली आहे. ३२ हजार रुपये टनाने आमच्या मोसंबीची विक्री झाली.  - स्वप्नील धोटे , शेतकरी, येरला धोटे, ता. काटोल, जि. नागपूर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com