शेवगावला गाजर वाटून शेतकऱ्यांचे आंदोलन 

शेवगावला गाजर वाटून शेतकऱ्यांचे आंदोलन 
शेवगावला गाजर वाटून शेतकऱ्यांचे आंदोलन 

नगर ः सर्व शेतीमालाची हमी दरानुसार खेरदी व्हावी यासह विविध मागण्यांसाठी शेवगाव येथे तहसील कार्यालयात गाजर वाटून आंदोलन करण्यात आले. या वेळी शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. 

शेतकऱ्यांच्या सर्व शेतीमालाची हमी दरानुसार खरेदी करावी, सर्व शेतकरऱ्यांचा सातबारा कोरा करावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करावी, सरकारने शेतकऱ्यांना सरकारने आश्वासन दिले. मात्र, त्याची अंमलबजावणी केली नाही. दिलेल्या आश्वासनाची तातडीने अंमलबजालनी करावी. 

सध्या जिल्हाभर दुष्काळ आहे. मात्र, अजूनही सरकारने फारशा उपाययोजना केल्या नाहीत. यामुळे तातडीने उपाययोजना कराव्यात. दुष्काळी भागातील फळबाग उत्पादकांना आर्थिक मदत करावी. यांसह विविध मागण्यांसाठी शेतकरी विकास मंडळातर्फे मंगळवारी शेवगाव तहसील कार्यालयात गाजर वाटून आंदोलन केले. 

त्यानंतर तहसीलदारांना निवेदन दिले. या वेळी शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष शिवराज कापरे, चंद्रकांत निकम, भाऊसाहेब चोपडे, अनिल लांडे, दीपक रुईकर, भिवसेन गिरमकर, नारायण निकम, भगवान शिंदे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com