agriculture news in marathi, Movement for fodder camps in the district | Agrowon

नाशिक जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी हालचाली
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

नाशिक  : जिल्ह्यातील टंचाईच्या झळा तीव्र होत असताना पिण्याच्या पाण्यासह जनावरांचा चारा व पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनत चालला आहे, हा प्रश्‍न सोडविण्यासाठी टंचाईग्रस्त भागात मंडलनिहाय चारा छावण्या उभारण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. छावणी उभारणीसाठी साखर कारखाने, बाजार समित्या, दूध खरेदी-विक्री संघासह सामाजिक संस्थाकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहे. 

नाशिक  : जिल्ह्यातील टंचाईच्या झळा तीव्र होत असताना पिण्याच्या पाण्यासह जनावरांचा चारा व पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनत चालला आहे, हा प्रश्‍न सोडविण्यासाठी टंचाईग्रस्त भागात मंडलनिहाय चारा छावण्या उभारण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. छावणी उभारणीसाठी साखर कारखाने, बाजार समित्या, दूध खरेदी-विक्री संघासह सामाजिक संस्थाकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहे. 

प्रशासनाने मंडलनिहाय चारा छावण्या सुरू करण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. जिल्ह्यात महिनाअखेरपर्यंत पुरेल इतका चारा उपलब्ध आहे. गाळपेरा, वनविभाग विकास महामंडळ तसेच राष्ट्रीय वैरण कार्यक्रमाअंतर्गत हिरवा चारा मिळणार आहे. मात्र, उपलब्ध चारा व वाढती मागणी बघता प्रशासनाने छावण्या सुरू करण्याची तयारी केली आहे.

छावण्या उभारल्यानंतर तेथे एकूण जनावरांपैकी पाच जनावरे सोडण्याची मुभा शेतकऱ्यांना असणार आहे. एका छावणीत २५० पासून ते ३ हजारांपर्यंत जनावरे ठेवण्यात येतील. जनावरांच्या चारा व पाणी तसेच इतर सुविधा पुरविताना मोठ्या जनावरामागे ९० तर लहान जनावरासाठी ४५ रुपये प्रतिदिन खर्च संबंधित संस्थांना दिला जाणार आहे.

सिन्नर तालुक्यातून चारा छावण्यासाठी सर्वाधिक मागणी होत आहे. छावण्या उभारणीसाठी जिल्ह्यातील साखर कारखाने, कृषी उत्पन्न बाजार समित्या, दूध खरेदी विक्री संघ, पांजरपोळ यासह सामाजिक संस्था, तसेच दानशूर व्यक्तींकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. मात्र, छावण्या उभारताना संस्थांसाठी नियमांची पूर्तता करणे बंधनकारक असेल, अशी माहिती सूत्रांनकडून मिळाली.

१० टक्के पाणी जनावरांना
जिल्ह्यात गंभीर दुष्काळी परिस्थितीमुळे ७ तालुक्यांमध्ये १८१ टँकरद्वारे ५०० च्या आसपास गावे-वाड्या-वस्त्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. सिन्नरच्या पूर्व पट्ट्यात दुष्काळाची दाहकता अधिक आहे. गावांना पाणीपुरवठा करताना त्यात १० टक्के वाढीव पाणी हे जनावरांसाठी देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सूूरज मांढरे यांनी यंत्रणेला दिल्या आहेत.

इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख...सोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११...
सोलापुरात यंदाही खरीप कोरडाचसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला....
नाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा...नाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या...
नाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर...नाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव,...
परभणी जिल्ह्यात १३ लघू तलावांतील...परभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी...
टंचाईस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती सादर...हिंगोली : टंचाईस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत...
जालना जिल्ह्यात दुधाचे पैसे दोन...जालना : जिल्ह्यातील जामवाडी, गणेशपूर, नळणी, येवता...
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली...औरंगाबाद  : मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर...
सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीपसांगली ः जिल्ह्यात जून आणि जुलैमध्ये झालेल्या...
कंडारी पाणी योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी...जळगाव ः कंडारी (ता. भुसावळ) येथील ग्राम...
शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित...नागपूर ः विकासाच्या संकल्पनांमध्ये रस्ते, नाले व...
सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेती...सातारा : जिल्ह्यात पश्चिमेकडे दमदार पाऊस, तर...
कापसाच्या हमीभावात ५०० रुपयांनी वाढ...अमरावती   ः राज्याची कमी असलेली कापूस...
दमदार पावसाअभावी पुणे जिल्ह्यातील पूर्व...पुणे  ः जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिरूर,...
नगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यातही...नगर  ः दुष्काळाने होरपळ झालेल्या नगर...
पावसाअभावी धुळे, जळगाव जिल्ह्यांत...जळगाव  ः खानदेशात सुरवातीला पावसाने जोरदार...
नागपूर विभागात पावसाअभावी पिकांची वाढ...नागपूर  ः निम्मा जुलै महिना संपत आला असतानाच...
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत...मुंबई  : भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री...
सुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...