प्रशासनाला निधी खर्चाचे अधिकार देण्याच्या हालचाली

प्रशासनाला निधी खर्चाचे अधिकार देण्याच्या हालचाली
प्रशासनाला निधी खर्चाचे अधिकार देण्याच्या हालचाली

जळगाव : जिल्हा परिषदेला नियोजन समिती व शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीच्या खर्चाचे नियोजन करता आले नाही. अनेक कामांसाठी आराखडे, प्रशासकीय व तांत्रिक मान्यतेची प्रतीक्षा आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर ५० लाख रुपये किमतीच्या कामांना मान्यता देता येणार नाही. त्यामुळे प्रशासनाला निधी खर्चाचे अधिकार देण्याच्या हालचाली सुरू आहेत. 

प्रशासनाला अधिकार देण्यावरूनही पदाधिकाऱ्यांमध्ये कुरबूर सुरू आहे. कारण सत्ताधारी भाजपमध्ये दोन गट आहेत. त्यांच्यात निधीवरून मागील दोन वर्षे रस्सीखेच झाली. मागील सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपचे सदस्य जयपाल बोदडे, पल्लवी सावकारे यांनी पदाधिकाऱ्यांवर निधी वाटपात दुजाभाव केल्याचा आरोप केला. यानंतर १२० कोटी रुपये निधीच्या नियोजनासाठी विशेष सर्वसाधारण सभा काही दिवसांपूर्वी झाली. त्यात निधी खर्चासाठी मान्यता देण्यात आली, परंतु शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने पदाधिकाऱ्यांवर एकाधिकारशाहीचा आरोप केला.

निधीच्या समान वाटपाचा मुद्दा सत्ताधारी भाजप, शिवसेना व दोन्ही काँग्रेसच्या काही सदस्यांनी उचलून धरला. यामुळे १२० कोटी रुपये निधीतून प्रस्तावित रस्ते, इमारतीचे बांधकाम, दुरुस्तीची कामे रेंगाळण्याची स्थिती आहे. अजूनही १६० कोटी रुपये निधीसंबंधी प्रशासकीय व तांत्रिक मान्यता राहिल्या आहेत. जिल्हा परिषदेत गोंधळाचे वातावरण आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com