माकप, किसान सभेतर्फे इस्लापूर येथे आंदोलन

नांदेड: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेच्या वतिने शनिवारी (ता. ५) देशव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार किनवट तालुक्यातील इस्लापूर येथे किसान सभेच्या वतीने शेतकऱ्यांच्या विवीध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.
 Movement at Islapur on behalf of CPI (M), Kisan Sabha
Movement at Islapur on behalf of CPI (M), Kisan Sabha

नांदेड : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेच्या वतिने शनिवारी (ता. ५) देशव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार किनवट तालुक्यातील इस्लापूर येथे किसान सभेच्या वतीने शेतकऱ्यांच्या विवीध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.

दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या रक्कम भरणा करून घेऊन शेतकऱ्यांना कर्ज माफी द्यावी, शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, दीडपट हमी भाव देऊन विना विलंब कर्ज वाटप करा, अशी मागणी ‘माकप’चे अर्जुन आडे यांनी केली.

किनवट तालुक्यातील शिवणी परिसरातील अनेक खेडे, तांड्यात इंटरनेट व नेटवर्कची सुविधा नाही. अनेक गावांत जाण्यासाठी चांगले रस्ते नाहीत, ते दुरूस्त करावे, नियमित पीककर्ज परत फेड करणाऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये द्यावे, अशा मागण्या करत इस्लापूर येथील भारतीय स्टेट बँके समोर व बसस्टँडच्या मुख्य चौकात आंदोलन करण्यात आले. 

यावेळी ‘माकप’चे जिल्हा सचिव अर्जुन आडे यांनी महसुल, भारतीय स्टेट बँक शाखा व्यवस्थापक व सहायक निबंधकांना निवेदन दिले. कॉ. इरफान पठाण,  कॉ. स्टॅलिन आडे, शेतकरी नेते कॉ. खंडेराव कानडे, प्रकाश वानखेडे, कॉ. प्रशांत जाधव, अंबर चव्हाण, बंटी पाटील, पंडीत चव्हाण आदीनी आंदोलन  केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com