संत्रा निर्यातीसाठी हालचालींना वेग

Onion export
Onion export

नागपूर ः मृग बहारातील संत्रा निर्यातीच्या हालचालींना वेग आला असून, आखाती देशांसह चीनमध्ये निर्यात होईल, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. खुद्द माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार याकरिता आग्रही असून चीनच्या प्रोटोकॉल लिस्टमध्ये संत्र्याचा समावेश व्हावा याकरिता लवकरच ते दिल्लीत वाणिज्य मंत्रालयाशी चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आले. चव, रंग याबाबतीत वेगळेपण जपणाऱ्या नागपुरी संत्र्याच्या निर्यातीसाठी आजवर पूरक प्रयत्नच झाले नाही. त्यामुळे घरगुती मार्केट वगळता इतर देशातील बाजारपेठेचा पर्याय नसल्याने शेतकऱ्यांना मिळेल त्या दरावरच समाधान मानावे लागत होते. संत्र्याच्या निर्यातीला चालना मिळावी याकरिता सिट्रसनेट हा गेटवे सुरु करण्याकरिता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला. अपेडाकडून गेटवे सुरू करण्यात आल्यानंतर दर्जेदार संत्रा निर्यातीचे प्रयत्न आता उत्पादक स्तरावर होत आहेत.  विशेष म्हणजे नागपुरी संत्र्याला यापूर्वीच भौगोलिक मानांकन देखील मिळाले आहे. अशा सर्व बाबी सकारात्मक असताना निर्यात मात्र वाढली नाही. त्याला चालना देण्याकरिता माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी संत्रा उत्पादकांशी नागपुरात चर्चा केली होती. त्याच वेळी त्यांनी चीनमधील भारतीय वाणिज्य प्रतिनिधी प्रशांत लोखंडे यांच्याशी संवाद साधत त्यांना चीनमध्ये संत्रा निर्यात होण्यासाठी प्रयत्न करावे, अशी सूचना केली. या घडामोडीनंतर निर्यातीसंबंधाने हालचालींना गती आली आहे. 

प्रोटोकॉल लिस्टसाठी पाठपुरावा चीनमध्ये संत्रा पाठविण्यासाठी त्यांच्या प्रोटोकॉल लिस्टमध्ये संत्र्याचा समावेश असणे गरजेचे आहे. त्याकरिता माजी केंद्रीय मंत्री शरद पवार येत्या आठवड्यात दिल्लीतील वाणिज्य मंत्रालयाशी चर्चा करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ४ लाख टन उत्पादन अपेक्षित विदर्भात वादळी पाऊस व गारपिटीनंतरही या वर्षी मृगाच्या संत्र्याची चार लाख टन उत्पादकता होण्याची शक्‍यता महाऑरेंजचे कार्यकारी संचालक श्रीधर ठाकरे यांनी वर्तविली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com