अवकाळीग्रस्त संत्रा उत्पादकांचे खडकी येथे आंदोलन

Movement of orange growers at Khadki
Movement of orange growers at Khadki

नगर ः दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने संत्रा उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, दोन दिवस उलटूनही प्रशासनाने या नुकसानीची दखल घेतली नसल्याने मंगळवारी (ता. ३) खडकी (ता. नगर) येथे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी अंदोलन केले. नुकसान झालेल्या फळबागांचे तातडीने पंचनामे करून प्रति हेक्टरी एक लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी या वेळी शेतकऱ्यांनी केली आहे.

नगर तालुक्यातील खंडाळा, खडकी, वाळकी या भागात संत्रा पिकाचे मोठे क्षेत्र आहे. येथील शेतकऱ्यांनी दुष्काळासारख्या गंभीर संकटावर मात करून संत्र्याच्या बागा जोपासल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे संत्र्याची मोठी फळगळ झाली असून आर्थिक नुकसान झाले आहे. दोन दिवस झाले तरी अजूनही पंचनामे झाले नसल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करीत मंगळवारी खडकी येथे आंदोलन केले. 

या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, महेश कोठूळे, भाऊसाहेब रोकडे, पत्रकार जितेंद्र निकम, आमृता कोठूळे, रतन भैरव आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com