पुणे कृषी महाविद्यालयात आंदोलन

अधिकारी व कर्मचारी लेखणी बंद आंदोलन करणार असून ६ नोव्हेंबर रोजी एक दिवस सामूहिक रजा घेण्यात येणार आहे. तसेच ७ नोव्हेंबर पासून बेमुदत लेखणी बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे कृषी विद्यापीठ कर्मचारी समन्वयक संघाचे कार्याध्यक्ष सुनील बडे यांनी सांगितले.
Movement in Pune Agricultural College
Movement in Pune Agricultural College

पुणे ः सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत असलेल्या पुणे कृषी महाविद्यालयातील शिक्षकांकडून मंगळवारी (ता. २७) आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल न घेतल्यास २ ते ५ नोव्हेंबर या कालावधीमध्ये अधिकारी व कर्मचारी लेखणी बंद आंदोलन करणार असून ६ नोव्हेंबर रोजी एक दिवस सामूहिक रजा घेण्यात येणार आहे. तसेच ७ नोव्हेंबर पासून बेमुदत लेखणी बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे कृषी विद्यापीठ कर्मचारी समन्वयक संघाचे कार्याध्यक्ष सुनील बडे यांनी सांगितले.

श्री. बडे म्हणाले की, कृषी विद्यापीठ सेवेतील अधिकारी, कर्मचारी यांना प्रत्येक दहा वर्षानंतर आश्वासित प्रगती योजनेसहित सातवा वेतन आयोग पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावा, या मागणीसाठी संघाने निवेदन दिले होते. तथापि शासनाने याबाबत कोणतीही भूमिका न घेतल्याने अखेर चारही कृषी विद्यापीठांतील अधिकारी व कर्मचारी यांनी आंदोलनास सुरुवात केली आहे. यासंबधीचे निवेदन सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासाळकर यांच्याकडे सादर केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com