जल प्रदुषण रोखण्यासाठी पूर्णा नदीपात्रात आंदोलन

अकोलाः पूर्णा नदीला दूषित करणाऱ्यांवर कारवाई होत नाही. यावर ठोस उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते गणेश पोटे यांनी बुधवारी (ता.१६) यांनी सलग पोहत आंदोलन केले.
Movement in Purna river basin to prevent water pollution
Movement in Purna river basin to prevent water pollution

अकोला ः पूर्णा नदीला दूषित करणाऱ्यांवर कारवाई होत नाही. यावर ठोस उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते गणेश पोटे यांनी बुधवारी (ता.१६) यांनी सलग पोहत आंदोलन केले. 

पूर्णा नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात दूषित झाले आहे. ते पाणी पिण्यायोग्य नाही. नदीकाठी असलेल्या गावांना पूर्णानदी हा जलस्त्रोत असल्याने मानवी तसेच पशुधनांसाठी पिण्याचे पाणी म्हणून वापर करण्याशिवाय पर्याय नाही. हा परिसर खारपाण पट्यात असल्याने भुगर्भातील पाणी पिण्यायोग्य नाही. अशा परिस्थितीत ग्रामस्थांना दुषित पाणी पिण्यासाठी वापरावे लागणे, हा मानव व पशुधनाच्या जिविताशी खेळ आहे. फेब्रुवारी २०१४ मध्ये पाणी दूषित असल्याचे तपासणीत आढळून आले होते. लोकप्रतिनिधींनीही प्रयत्न केले. परंतु, शासनाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने नाईलाजास्तव आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे पोटे यांनी सांगितले. 

आंदोलनापासून त्यांना रोखण्यासाठी दहिहांडा पोलिसांनी मंगळवारी नोटीस बजावली होती. मात्र, रात्रीच ते गायब झाले व बुधवारी सकाळी थेट नदी पात्रात उतरून त्यांनी आंदोलन करून लक्ष वेधून घेतले. त्यांचे आंदोलन सुरू असताना पूर्णा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत होते. हे आंदोलन बघण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती.

यामुळे होते दुषित पाणी

अमरावती जिल्ह्यातील अंबा नाल्याचे पाणी पेढी नदी मार्गाने पूर्णा नदीत मिसळते. त्यामुळे पाणी रासायनिकदृष्ट्या दूषित होते. अमरावती एमआयडीसीचे पाणी पूर्णा नदीत सोडण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया करावी आणि याप्रकरणी कारवाई व्हावी, अशी पोटे यांची मागणी आहे. पूर्णा नदीच्या पाण्यावर लाखपुरी, दातवी, भटोरी, पारद, सांगवामेळ, धुंगशी, मुंगशी, विरवाडा, म्हैसांग, कट्यार, वडद, कपिलेश्वर, काटी, पाटी, किनखेड, नेर धामणा, गोपाळखेड, गांधीग्राम, केळीवेळी, दोनवाडा आदी गावांतील ग्रामस्थ अवलंबून आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com