कंधारमध्ये पीकविमा परताव्यासाठी आंदोलन

कंधारमध्ये पीकविमा परताव्यासाठी आंदोलन
कंधारमध्ये पीकविमा परताव्यासाठी आंदोलन

कंधार, जि. नांदेडः पीकविमा परतावा तसेच पीककर्ज वाटपप्रश्नी राष्ट्रवादी किसान सभेचे राज्यप्रमुख तथा माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काॅंग्रेसतर्फे सोमवारी (ता. ९) कंधार (जि. नांदेड) येथील महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या शाखेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

पीकविमा योजना शेतकऱ्यांपेक्षा सत्ताधारी पक्षाच्या दोस्त कंपन्याच्या अधिक हिताची ठरली आहे. पेरणी होऊन जवळपास एक महिना उलटला तरीही प्रशासन व बँकांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे आजपर्यंत मागील पीकविमा रक्कम व नवीन पीककर्ज न मिळाल्याने चालू हंगाम धोक्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ पीकविमा परताव्याची रक्कम, तसेच नवीन पीककर्ज वाटप करावे, अशी मागणी शंकरअण्णा धोंडगे यांनी केली. या आंदोलनात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे तालुका अध्यक्ष शिवदास धर्मापुरीकर, जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता पवार, जिल्हा उपाध्यक्ष मनोहर पाटील भोसीकर, संजय पाटील कराळे, बाबूराव केंद्रे आदींसह शेतकरी सहभागी झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com