Agriculture news in Marathi, Movement in Shegaon to continue the camps | Page 2 ||| Agrowon

छावण्या सुरू ठेवण्यासाठी शेवगावात आंदोलन
टीम अॅग्रोवन
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

नगर ः शेगाव तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये अजूनही पुरेसा पाऊस नाही, त्यामुळे जनावरे जगवण्याची चिंता कायम आहे. त्यासाठी प्रशासनाने जनावरांच्या छावण्या सुरू ठेवाव्यात व जेथे गरज आहे तेथे नव्याने छावणी सुरू करावी. या मागणीसाठी शेवगाव येथे जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.  

नगर ः शेगाव तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये अजूनही पुरेसा पाऊस नाही, त्यामुळे जनावरे जगवण्याची चिंता कायम आहे. त्यासाठी प्रशासनाने जनावरांच्या छावण्या सुरू ठेवाव्यात व जेथे गरज आहे तेथे नव्याने छावणी सुरू करावी. या मागणीसाठी शेवगाव येथे जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.  

शेवगाव तसेच पाथर्डी तालुक्यांमध्ये यंदाच्या पावसाळ्यात अजूनही पुरेसा पाऊस नाही. त्यामुळे गेल्या वर्षी पडलेला दुष्काळ अजूनही कायम आहे. पुरेसा पाऊस नसल्याने पाणीटंचाई आणि चाऱ्याचा प्रश्न वरचेवर गंभीर होत चालला असून चिंता कायम आहे. गेल्या वर्षी शासनाने दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी जनावरांच्या छावण्या सुरू केल्या होत्या. त्या छावण्या सुरू ठेवाव्यात, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. 

तसेच पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक गावात टँकर सुरू ठेवावेत, अशी मागणी तालुक्यातील लोकांची आहे. याच मागणीसाठी गुरुवारी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांच्या नेतृत्वाखाली शेवगावात आंदोलन करण्यात आले. आंदोलनात गहीनाथ कातकडे, जगन्नाथ गावडे, संजय नागरे, अजय नजन, नवनाथ खेडकर, कृष्णा चौगुले यांच्यासह कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. 

पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यांत पडलेल्या गंभीर दुष्काळाची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन चारा छावण्या पाण्याचे टँकर सुरू करावेत, अन्यथा महामोर्चा काढण्याचा इशारा हर्षदा काकडे यांनी दिला आहे. आंदोलनानंतर तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

इतर ताज्या घडामोडी
नांदुरा तालुक्यात दुधाळ जनावरांमध्ये घटनांदुरा, जि. बुलडाणा  : जिल्ह्यात दुधासाठी...
चिखली तालुक्यात पावसाची जोरदार हजेरीअकोला  ः या मोसमातील मॉन्सून परतला असला, तरी...
आर्द्रतेआड सोयाबीनची कमी दराने खरेदीधामणगावरेल्वे, अमरावती  ः हंगामातील नव्या...
कीड ओळखूनच व्यवस्थापन पद्धती वापरा : डॉ...जालना : ‘‘रासायनिक कीटकनाशकांच्या जास्त...
मागण्यांच्या पूर्ततेसाठी एचएएल...नाशिक  : नाशिककरांनी यशवंतराव चव्हाणांना...
अंतिम टप्प्यातील प्रचारामुळे सांगलीत...सांगली : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या...
कोल्हापूर, सिंधुदुर्गातील काही भागांत...कोल्हापूर, सिंधुदुर्ग : गेल्या पंधरा दिवसांच्या...
बोराळे येथे शॉर्टसर्किटमुळे ऊस जळून खाकनाशिक : नांदगाव तालुक्यातील बोराळे येथील शेतकरी...
परभणी जिल्ह्यात हरभऱ्याची २ हजार ९००...परभणी : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान (कडधान्य)...
नांदेडमध्ये खरीप पिकांना पावसाचा फटका नांदेड : नांदेड जिल्ह्यातील चार तालुक्यांतील १०...
शेती, शेतकरीप्रश्न हाताळण्यात कुचराईच...शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांना ज्या...
बियाणे उद्योगाच्या विकासासाठी स्थितीत...बियाणे उद्योगात आपले राज्य पूर्वीपासून अग्रेसर...
हमीभावाने कडधान्य विक्रीसाठी ऑनलाइन...जळगाव ः उडीद, मुगाची शासकीय खरेदी केंद्रांत...
ढगाळ हवामानामुळे साताऱ्यातील...सातारा  ः अतिवृष्टी तसेच परतीच्या पावसाचे...
जिल्हा बॅंकांची आर्थिक कोंडी चिंताजनकभूविकास बॅंका मृत्युशय्येवर गेल्यापासून...
प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीसाठी सज्जमुंबई ः विधानसभेच्या निवडणुकीसाठी सोमवारी (ता. २१...
नगर जिल्ह्यात हमीभावाने शेतीमाल...नगर  ः मूग, उडीद, सोयाबीनची हमीभावाने खरेदी...
शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी सरसकट...अंबाजोगाई, जि. बीड  : भाजपची मनोवृत्ती...
रोजगारनिर्मितीत सरकार अपयशी :...कोल्हापूर  : गेल्या पाच वर्षांत देशातील दोन...