Agriculture news in Marathi, Movement for start 'Nasaka' | Agrowon

‘नासाका’ सुरू व्हावा यासाठी पुन्हा हालचाली सुरू 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि पुणे येथील एस. एस. बी. एम. इंडिया शुगर इंडस्ट्रीज लि. जुन्नर पुणे यांच्या प्रयत्नातून चालू वर्षी गाळप हंगाम चालू व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. याच अनुषंगाने नाशिक सहकारी साखर कारखाना सुरू व्हावा याकरिता जिल्ह्यातील सर्व कामगार, शेतकऱ्यांची बैठक कारखाना कार्यस्थळावर रविवारी (ता. ११) आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी कामगारांनी एकमताने मागणी करून सकारात्मक भूमिका जाहीर केली.

नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि पुणे येथील एस. एस. बी. एम. इंडिया शुगर इंडस्ट्रीज लि. जुन्नर पुणे यांच्या प्रयत्नातून चालू वर्षी गाळप हंगाम चालू व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. याच अनुषंगाने नाशिक सहकारी साखर कारखाना सुरू व्हावा याकरिता जिल्ह्यातील सर्व कामगार, शेतकऱ्यांची बैठक कारखाना कार्यस्थळावर रविवारी (ता. ११) आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी कामगारांनी एकमताने मागणी करून सकारात्मक भूमिका जाहीर केली.

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी कामगारांकरिता सुप्रीम कोर्टात दाखल केलेले व जमा रकमेतून कामगारांची प्रोव्हिडंट फंडाची व सोसायटीची रक्कम देण्यात येणार असल्याच्या प्रस्तावाचे कामगारांनी स्वागत केले. बँकेने संबंधित कंपनीला लवकर पत्र देऊन कळवावे, अशी संघटनेने भूमिका मांडून स्पष्ट केले. यानंतर चार तालुक्यांतील सर्व शेतकरी, ऊस उत्पादक याचा नासाकाला कायम पाठिंबा असेल अशी घोषणा केली. सभेच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष विष्णूपंत गायखे होते. 

या वेळी मृत कामगारांना श्रद्धांजली वाहण्यात आली. स्वागत शिवराम गायधनी यांनी केले. कामगारांमधून पंडित सोनवणे, सुभाष हुळहुळे, बबनराव कांगणे, चंद्रभान कोंबडे, ज्ञानेश्वर गायधनी, गणपत कानडे, पूजा फोकणे यांनी चर्चेत सहभाग घेतला. नासाका बचाव कृती समितीचे अध्यक्ष विलास गायधनी यांनी ऊस उत्पादक, शेतकरी, कामगारांच्या दृष्टीने कामगार संघटनेने योग्य निर्णय घेतला. त्याबद्दल नासाका बचाव कृती समितीच्या वतीने अभिनंदन केले. 

श्रीकांत गायधनी, सोमनाथ रोकडे, अविनाश गायधनी, तुषार गायधनी या प्रसंगी सेवानिवृत्त कामगार संघटनेचे अध्यक्ष नामदेव बोराडे, भाऊसाहेब आडके, शंकर रोकडे, शरद पगार, सुरेश दळवी, नंदू बरकले, शिवाजी गायधनी, मधुकर मुठाळ, दिनकर गायधनी, नामदेव सहाणे, विष्णुपंत आडके, विजय शिंदे मोठ्या संख्येने उपस्थित होते.


इतर बातम्या
पुणे जिल्ह्यात `कृषी, उद्योग, ऊर्जा’...पुणे : जिल्ह्याच्या २०२०-२१ च्या प्रारूप वार्षिक...
‘टेंभू’चे आवर्तन पुढील आठवड्यात...सांगली : टेंभू उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करा...
भंडारा : केवळ खरेदी केंद्रांवरच मिळतोय...भंडारा : महाविकास आघाडीकडून ५०० रुपयांचे बोनस आणि...
जळगाव जिल्ह्यात शासकीय धान्य खरेदीला...जळगाव : जिल्ह्यातील तीन केंद्रांमध्ये सोयाबीनची व...
सातारा जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर...सातारा : जिल्ह्यात रब्बी हंगामातील कांद्याची...
हरितक्रांती घडविताना सुपीकता हरवली:...अकोला : अन्नधान्य निर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण...
लातूर विभागात रब्बीत बारा लाख हेक्‍टरवर...लातूर : लातूर कृषी विभागांतर्गत लातूर,...
उद्योगांच्या दबावाने कापूस निर्यात बंदी...पुणे ः कापसाला आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगले दर...
वाइन उद्योगाला अडचणीतून मुक्त करणार ः...नाशिक : वाइन उद्योगाला मागील काही दिवसांपासून...
सत्तावीस लाख शेतकऱ्यांचे ‘आधार’ रखडलेपुणे: शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात...
गोंदिया : सौरकृषिपंप उभारणीचे कार्यादेश...गोंदिया  ः राज्य शासनाची ‘मुख्यमंत्री...
वायफाय मोफत हवाय? घरपट्टी, पाणीपट्टी भराकोल्हापूर : ‘‘वायफाय मोफत हवाय? घरपट्टी व...
कर्जमाफीचा शब्द पाळू ः मुख्यमंत्रीइस्लामपूर, जि. सांगली ः कर्जमाफीचा आम्ही दिलेला...
अकोला जिल्ह्यात मजूरटंचाईमुळे कापूस...अकोला ः शेतीकामांसाठी दिवसेंदिवस मजूर समस्या भीषण...
सावित्रीच्या लेकींचा जागर करीत घराच्या...नाशिक : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे...
उत्तर महाराष्ट्रात अधिक गारठापुणे : राज्यात गारठा वाढला असला तरी, किमान...
अंजीर-सिताफळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ...पुणे : महात्मा फुले कृषी विद्यापिठाच्या ...
तोलाई मजुरीसाठी सांगली बाजार समितीच्या...सांगली : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तोलाई...
महिनाभरात पडणार नाशिक विभागातील साखर...नगर ः नगर, नाशिक जिल्ह्यामध्ये यंदा ३२ पैकी केवळ...
महिलांनी मालक बनले पाहिजे ः राज्यपालमुंबई ः महालक्ष्मी सरस प्रदर्शनातून महिलांचे...