एफआरपीसाठी साखर आयुक्तालयासमोर रसवंती आंदोलन

एफआरपीसाठी साखर आयुक्तालयासमोर रसवंती आंदोलन
एफआरपीसाठी साखर आयुक्तालयासमोर रसवंती आंदोलन

पुणे ः माजलगाव (जि. बीड) तालुक्यातील लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना तेलगाव, छत्रपती सहकारी साखर कारखाना सावरगाव आणि जय महेश साखर कारखाना पवारवाडी या तिन्ही साखर कारखान्यांनी गाळप सुरू झाल्यापासून ऊसउत्पादक शेतकऱ्यांचे एफआरपीप्रमाणे पैसे (बिल) दिलेले नाही. हे पैसे त्वरित मिळण्यासाठी माजलगाव तालुका शिवसेनेच्या वतीने साखर आयुक्तालयासमोर मंगळवार (ता. १५) पासून रसवंती आंदोलन करण्यात आले आहे.

शिवसेनेचे माजलगाव तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव म्हणाले, की माजलगावमधील तिन्ही साखर कारखान्यांनी गेल्या दोन महिन्यांपासून ऊसगाळपास सुरवात केली आहे. आता दोन महिने झाले असून ऊसगाळपास देणाऱ्या शेतकऱ्यांना अद्याप ऊस बिलाचा हप्ता अदा करण्यात आलेला नाही. शासन नियमानुसार ऊस बिलाचा हप्ता पंधरा दिवसांच्या आत देणे बंधनकारक आहे. 

तालुक्यातील या कारखान्यांनी अद्यापही ऊसाचा पहिला हप्ता दिला नाही. तो तत्काळ अदा करण्यात यावा. कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस बिल देण्यास उशीर होत असल्याने व दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांसमोर अडचणीचा डोंगर उभा राहिला आहे. या अत्यल्प प्रमाणात पाऊस झाल्याने तालुक्यात दुष्काळ असल्याने माजलगाव मतदारसंघातील शेतकऱ्यांनी आपला ऊस कसाबसा जोपासला आहे. त्यात भर म्हणजे ऊस पाण्याअभावी वाळत असल्याने तो लवकर गाळपास जावा म्हणून शेतकऱ्यांना खेटे मारावे लागले आहेत. 

ऊस गाळपास गेल्यानंतर गाळप झालेल्या उसाचे बिल अदा केलेले नाही. यामुळे तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीला आला असून हताश झाला आहे. शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी याप्रश्नी साखर आयुक्तांनी तत्काळ बिलाचे पैसे अदा करण्याच्या सूचना संबधित कारखाना प्रशासनाला द्याव्यात, अशी मागणी केली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com