दुष्काळी मदतीसाठी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचे कोरड्या विहिरीत आंदोलन
दुष्काळी मदतीसाठी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचे कोरड्या विहिरीत आंदोलन

दुष्काळी मदतीसाठी `स्वाभिमानी`च्या कार्यकर्त्यांचे कोरड्या विहिरीत आंदोलन

बुलडाणा : खामगाव तालुक्यात भीषण दुष्काळ निर्माण झाला असून त्याबाबत राज्यकर्ते बोलायला तयार नाहीत. याचा निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खामगाव तालुक्यातील पारखेड येथे मंगळवारी (ता. ८) ५० फूट खोल विहिरीत उतरू आंदोलन केले.

संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे यांच्या नेतृत्वात राजू नाकाडे, संजय लहुडकार, सचिन पाटील, गजानन धमोडे, अशोक देशमुख, अशोक यादगिरे, संजय नाकडे, अनिल देशमुख, अण्णा कुराडे, लक्ष्मण सोळंके, शिवाजी नाकडे, राम डोंगरदिवे, विजय ताडपते, महादेव पवार, रमेश नाकाडे यांच्यासह शेतकरी आंदोलनात सहभागी झाले.

याबाबत फाटे म्हणाले, दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत असताना हे सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. जिल्हा दुष्काळी घोषित झाला पण त्यावर उपाययोजना केल्या जात नाहीत. तुरीचे अनुदान रखडले आहे. यामुळे शेतकरी हताश झाला आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांची गंभीर दखल न घेतल्यास जिल्ह्यात एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही.``

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com