Agriculture news in marathi Movements to change Congress state president | Agrowon

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली

टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 जानेवारी 2021

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांचे नाव पुन्हा समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भात पाय पसरणे सुरू केल्याने खासदार प्रफुल्ल पटेल यांना रोखण्यासाठी पटोले अस्र काढण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 

नागपूर ः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांचे नाव पुन्हा समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भात पाय पसरणे सुरू केल्याने खासदार प्रफुल्ल पटेल यांना रोखण्यासाठी पटोले अस्र काढण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 

पटोले आक्रमक आणि महत्त्वाकांक्षी आहेत. मंत्रिपदापेक्षा पक्षसंघटनेत काम करण्याची त्यांची इच्छा आहे. प्रदेशाध्यक्ष होण्याची त्यांनी यापूर्वीच इच्छा व्यक्त केली होती. काँग्रेस-भाजप-काँग्रेस अशी राजकीय भ्रमंती त्यांनी केली होती. सार्वजनिक ठिकाणी थेट बोलून मोकळे होण्याच्या त्यांचा स्वभाव यास आड आला. 

भाजपत असताना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी जाहीरपणे तोफ डागली होती. त्यामुळे काँग्रेसच्याच अनेक नेत्यांनी सावध पवित्रा घेतला होता. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर मृदुभाषी बाळासाहेब थोरात यांच्या नावाला पसंती दिली होती. पटोले यांना फारसे बोलता येऊ नये

म्हणून त्यांना विधानसभेचे अध्यक्षपद देण्यात आल्याचेही बोलले जाते. याकरिता महाआघाडीतील सर्वच नेत्यांनी यास एकमताने संमती दिली होती, असेही कळते. 

महाघाडीची सत्ता आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आपण मोठा भाऊ असल्याचा दावा करणे सुरू केले आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील आमदारांची संख्या निश्‍चित असल्याने पक्षवाढीसाठी राष्ट्रवादीला विदर्भात मोठी संधी असल्याचे जाणवू लागले आहे. याची जबाबदारी प्रफुल्ल पटेल आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सोपविली आहे. पटेल यांनी राष्ट्रवादीला मोठा भाऊ संबोधून आतापासूनच वाढीव जागांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. 

पटेल-पटोले हे परंपरागत प्रतिस्पर्धी आहेत. मृदुभाषी पटेल यांना रोखण्यासाठी आक्रमक पटोले यांना अध्यक्ष केल्यास किमान विदर्भात तरी काँग्रेस शाबूत राहील, असा राजकीय तर्क व्यक्त केल्या जात आहे. विदर्भात काँग्रेसची पाळेमुळे अद्यापही शाबूत आहेत. राष्ट्रवादीचे अस्तित्व फक्त नेत्यांच्या मतदारसंघापुरते मर्यादित आहे. राष्ट्रवादीच्या विस्ताराकडे दुर्लक्ष करणे काँग्रेसला भविष्यात महाग पडू शकते. पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात काँग्रेसची लोकप्रियता कमी होत चालली आहे.


इतर ताज्या घडामोडी
शेतीच्या उन्नतीसाठी ज्ञानच महत्त्वाचे...पुणे : कृषीप्रधान देश असलेल्या भारतात शेतीला...
अवकाळीच्या तडाख्यात शेवग्याचे पुन्हा...नाशिक : गत जानेवारी महिन्यात झालेल्या अवकाळी...
खानदेशात वीजबिल वसुलीसाठी शेतकऱ्यांमागे...जळगाव : खानदेशात कृषिपंपांची वीजबिल थकबाकी...
खानदेशात मका दर सुधारलेजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत...नांदेड : जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगाम २०२०-२१...
‘महाखनिज’मध्ये परराज्यांतील वाळूची...परभणी ः ‘‘राज्य शासनाने परराज्यांतून होणाऱ्या...
पुणे बाजार समितीत पायाभूत सुविधा द्या,...पुणे ः पुणे बाजार समितीमधील भुसार विभागातील...
परभणी : संचालक मंडळाच्या निवडणूकीत...परभणी ः परभणी जिल्हा बॅंक संचालक मंडळाच्या...
सातारा जिल्हा बॅंकेसाठी दोन हजारांवर...सातारा : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी सोसायटीसह...
सात वर्षांत हमीभावात ऐतिहासिक वाढ ः...नवी दिल्ली : गेल्या सात वर्षांत केंद्र सरकारने...
सोलापुरात शेतकऱ्यांना थेट कर्जवाटप करणारसोलापूर : आर्थिक स्थितीमुळे गेल्या चार-पाच...
पणनची कापूस खरेदी रविवारपासून बंदनागपूर : बाजारात हमीभावापेक्षा कापसाला मिळणारा...
राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी...सोलापूर : सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या...
शेतीला दिवसा आठ तास वीजपुरवठा करा :...मुंबई : राज्यात वीजेचे दर कमी करण्याचे व...
मराठा आरक्षणाची सुनावणी सर्वोच्च...मुंबई : ‘‘देशातील अनेक राज्यांमधून त्यांच्या...
शॉर्टसर्किटमुळे आग; अकराशे आंबा, काजू...रत्नागिरी : तालुक्यातील शीळ-सड्यावर वणव्याच्या...
घनकचरा पथदर्शी प्रकल्पांसाठी सिंधुदुर्ग...वैभववाडी : स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या...
अकोल्यात रब्बीसाठी ५४ कोटींचे पीककर्ज...अकोला : यंदाच्या रब्बी हंगमात जिल्ह्यात लागवड...
भाजपला दिला आयारामांनी झटका...सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महालिकेवर गेल्या अडीच...
तंत्र कोथिंबीर लागवडीचे...कोथिंबीर पिकास नियमित ४ ते ५ दिवसांनी पाणी द्यावे...