‘म्हैसाळ’मधून पाणी सोडण्याच्या हालचाली

Movements to release water from the 'mhaisal'
Movements to release water from the 'mhaisal'

सांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्याच्या हालचाली सुरू आहेत. थकबाकी वसुलीसाठी गेल्या आठवड्यापासून लाभक्षेत्रात गावनिहाय बैठका सुरू आहेत. योजनेत शेतकऱ्यांनी पाणी सोडण्याची मागणी नोंदवण्यास सुरुवात केली असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.

म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची वीजबिले सुमारे ३२ कोटीच्या घरात आहेत. तर, पाणीपट्टी ३० कोटी इतकी थकली आहे. पाणीपट्टी वसूल झाली तरच ही योजना सुरू करता येईल. त्यामुळे पाटबंधारे विभागाने पाणीपट्टी वसुलीसाठी पुढाकार घेतला आहे. सध्या पाटबंधारे विभागाने पाणीपट्टी जमा करण्यासाठी लाभ क्षेत्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीला पत्र दिले आहे. मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ, जत तालुक्यातील पाणीपट्टी वसुलीसाठी गावनिहाय बैठका घेण्याचे सत्र सुरू आहे.

प्रत्येक उपअभियंता आणि शाखा अभियंत्यावर वसुलीची जबाबदारी निश्चित केली आहे. रब्बी आणि द्राक्ष हंगाम पावसाच्या पाण्यावर पार पडला. आता द्राक्षांच्या आणि उन्हाळी पिकांसाठी पाण्याची आवश्यकता लागेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू करण्याची मागणी केली आहे.  

दरम्यान, पाटबंधारे विभागाने पाणीपट्टी वसुलीची मोहित हाती घेतल्याने त्यास प्रतिसाद मिळत आहे. त्याचप्रमाणे योजनेचे पाणी सोडण्याची मागणीही अधिकारी नोंदवून घेत आहेत. उपसा सिंचन योजनेच्या पंपाची देखभाल आणि दुरुस्ती बहुतांशी पूर्ण झाली आहे. उन्हाळी पिकांसाठी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाणी सुरू होण्याची शक्यता आहे. 

कालव्यांचे अस्तरीकरण अंतिम टप्प्यात 

म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या मुख्य कालव्याची गळती काढण्याचे काम हाती घेतले आहे. अनेक ठिकाणी कालव्यांच्या अस्तरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे पाण्याची गळती कमी होण्यास मदत होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com