जालना जिल्ह्यात उन्हाळी सोयाबीन प्रयोगाची अंतिम टप्प्याकडे वाटचाल

जालना: जिल्ह्यात यंदा पहिल्यांदाच केलेल्या उन्हाळी सोयाबीन पेरणीच्या प्रयोगाची अंतिम टप्प्याकडे वाटचाल सुरू आहे.
Moving towards the final stage of summer soybean experiment in Jalna district
Moving towards the final stage of summer soybean experiment in Jalna district

जालना:  जिल्ह्यात यंदा पहिल्यांदाच केलेल्या उन्हाळी सोयाबीन पेरणीच्या प्रयोगाची अंतिम टप्प्याकडे वाटचाल सुरू आहे. कुठे सोयाबीन दाणे भरण्याच्या, तर कुठे काढणीच्या अवस्थेत येऊन ठेपले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी सोयाबीन मळणी होऊन उत्पादनही हाती आल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

यंदा पहिल्यांदाच मराठवाड्यात प्रायोगिक तत्त्वावर उन्हाळी सोयाबीनची पेरणी करण्यात आली. जालना जिल्ह्यात जवळपास ८५० हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. यात जोडओळ पद्धतीने पेरणीला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले. जवळपास दोन ते तीन फवारण्या व खताच्या व्यवस्थापन केले. येत्या खरिपात चांगल्या प्रतीचे बियाणे तयार होऊन तालुक्यातील इतर शेतकऱ्यांना त्याचा पुरवठा करण्याच्या उद्देशाने हा नाविन्यपूर्ण प्रयोग राबविण्यात आला. 

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब  शिंदे यांच्या संकल्पनेतून हा प्रयोग राबविण्यात आला. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील तळणी येथे शेतकरी दारासिंग भगवानसिंग चव्हाण यांनी ६० गुंठे क्षेत्रावर उन्हाळी सोयाबीनची पेरणी केली होती. त्यांनी फुले संगम हा वाण वापरला. २७ जानेवारी २०२१ रोजी पेरणी करताना एकरी २० किलो बियाणे वापरले होते.

पेरणी सोबत १५:१५:०९ खतही दिले. पेरणीनंतर १५ दिवसांनी पहिली अलिका फवारणी त्यानंतर प्रोपेनोफॉस+१२:६१खत +(टिल्ट) बुरशी नाशक व तिसरी इमामेकटीन बेन्झोईटची पेरणी नंतर ४७ दिवसाने फवारणी केली. 

सोयाबीनवर पाने खाणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव दिसून आला. आजघडीला प्रति झाड सरासरी ८० ते ९० शेंगा लगडल्या आहेत. त्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहेत. आजपर्यंत एकरी खर्च ६९०० रुपये झाला. चव्हाण यांना एकरी अपेक्षित उत्पन्न ७ ते ९ क्विंटल आहे. मंठा तालुक्यातील एकूण उन्हाळी सोयाबीनचे एकूण क्षेत्र ३४ हेक्टर असल्याचेही कृषी विभागाकडून सांगण्यात आले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com