बुलडाणा जिल्ह्यातील टँकरची ‘शंभरी’कडे वाटचाल

बुलडाणा जिल्ह्यातील टँकरची ‘शंभरी’कडे वाटचाल
बुलडाणा जिल्ह्यातील टँकरची ‘शंभरी’कडे वाटचाल

बुलडाणा : कमी पाण्यामुळे सलग तिसऱ्या वर्षी जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता नागरिकांना झेलावी लागत आहे. आधी पिकांची उत्पादकता घटल्याची झळ सहन केली. आता प्यायच्या पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. मार्चच्या पहिल्याच आठवड्यात जिल्ह्यात ८७ टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. लवकरच टँकरची संख्या १०० चा आकडा ओलांडेल, अशी परिस्थिती आहे.     

जिल्ह्यातील पाणीटंचाई दिवाळीनंतरच सुरू झाली. ही परिस्थिती लक्षात घेत कृती आराखडा तयार करण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे तीनशे गावांमध्ये उपाययोजना राबविण्यात आल्या असून, त्यावर साडेसहा कोटींचा खर्च झाला. शासनाकडे २०१५-१६ पासून सुमारे नऊ कोटी ८३ लाख थकले आहेत. एकीकडे पाणीटंचाई वाढत असताना दुसरीकडे निधीचाही प्रश्न भेडसावत आहे. जिल्ह्याच्या टंचाई निवारण आराखड्यानुसार १२७२ गावांपैकी ११७३ गावांमध्ये हे टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. यासाठी सुमारे दोन हजारांवर उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. हा टंचाई आराखडा राबविण्यासाठी सुमारे ४५ कोटी रुपयांची गरज आहे. आजवर पाचशे गावांमध्ये उपाययोजना राबविण्यात आल्या. 

प्रकल्पांमध्ये पाणी नसल्याने, विहिरींची पातळी खोल गेल्याने योजनांवर विपरित परिणाम झाला आहे. १०४ गावांतील नळ योजनांच्या दुरुस्तीसाठी विशेष मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी २६ गावांत उपाययोजनांची कामे सुरू आहेत. मात्र त्यांची गती संथ आहे. टंचाईग्रस्त ४२८ गावांमध्ये ५९१ विंधन विहिरी खोदण्याचे कृती आराखड्यात प्रस्तावित होते. जिल्ह्याची भूजल पातळी दीड मीटरपेक्षा अधिक खोल गेली आहे. भूगर्भातील पाणी कमी झाल्यामुळे आधी घेतलेल्या विंधन विहिरींच्या विशेष दुरुस्तीचाही प्रश्न निर्माण होत आहे.  

घाटावरील बुलडाणा, देऊळगावराजा या तालुक्यांत अधिक टंचाई आहे. टँकरने पाणीपुरवठा होत असलेल्या गावांमध्ये २९ गावे या दोन तालुक्यांतील आहेत. यासोबतच खामगाव, शेगाव, मोताळा, चिखली या तालुक्यांतही टंचाईची स्थिती बिकट आहे. येत्या काही दिवसांत जिल्ह्यात टँकरचा आकडा शंभरी ओ लांडणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com