agriculture news in marathi MP Godse inspects the work of agricultural schemes | Agrowon

खासदार गोडसेंकडून कृषी योजनांच्या कामांची पाहणी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 2 डिसेंबर 2020

नाशिक :  शेतीच्या प्रगतीची पाहणी करण्यासाठी सोमवारी (ता.३०)खासदार हेमंत गोडसे यांनी ग्रामीण भागात दौरा केला.

नाशिक : शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने आणलेल्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचतात की नाही, तसेच अनुदानातून साधनसामुग्री उभारून शेतीच्या प्रगतीची पाहणी करण्यासाठी सोमवारी (ता.३०)खासदार हेमंत गोडसे यांनी ग्रामीण भागात दौरा केला. त्यात त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांशी संवाद साधला. समस्या जाणून घेतल्या. 

ठिबक सिंचन योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना, विमा योजना, मृदा आरोग्य पत्रिका, (माती परिक्षण), कृषियांत्रिकी योजना आदी केंद्र शासनाच्या योजना आहेत. त्याद्वारे शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी विशेष अनुदान दिले जाते. या योजनांचा शेतकऱ्यांना नेमका किती आणि कसा लाभ होतो, याची माहिती गोडसे यांनी यावेळी जाणून घेतली. नाशिक, सिन्नर, इगतपुरी या तालुक्यांमधील ग्रामीण भागाचा त्यांनी दौरा केला. 

नाशिक तालुक्यातील दोनवाडे येथून पाहणी दौऱ्याला प्रारंभ झाला. येथील संजय त्र्यंबक सांगळे यांच्या शेडनेट तसेच काशिनाथ वाघ यांच्या पॉलीहाऊसची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर सोमनाथ सांगळे यांनी शासनाच्या अनुदानातून उभारलेल्या कांदाचाळीची पाहणी करून त्यासाठी शासनाकडून पुरेसे अनुदान मिळते का? याची माहिती गोडसे यांनी घेतली.

सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली येथे विलास बोराडे यांच्या द्राक्ष बागांची पाहणी केली. पांढुर्ली शिवारात कृषी यांत्रिकी योजनेंतर्गत लाभार्थ्यांना शासनाच्या अनुदानातील साधन सामग्रीचे वाटप करण्यात आले. 

साकूर फाट्यावर भाजीपाला विक्री केंद्र 

इगतपुरी तालुक्यातील साकूर फाटा येथे ‘विकेल ते पिकेल’ या शासनाच्या धोरणांतर्गत थेट भाजीपाला विक्री केंद्राचे उद्‌घाटन करण्यात झाले. त्रिगंलवाडी येथील पाणलोट विकास योजनेतून झालेल्या कामांची सविस्तर माहिती जाणून घेतली.


इतर ताज्या घडामोडी
तूर विक्रीसाठी ३९८० शेतकऱ्यांची नोंदणीपरभणी ः यंदाच्या खरीप हंगामात (२०२०-२१) आधारभूत...
लातूर येथे बुधवारी जवस पीक प्रात्यक्षिकपरभणी ः लातूर येथील गळीतधान्‍ये संशोधन केंद्र...
कृषी यंत्रणेला तत्पर करणार ः धीरजकुमारऔरंगाबाद : मराठवाड्यासह राज्यातील कृषी विस्तार व...
नगरमध्ये कावळे ‘बर्ड फ्लू’ बाधितनगर ः श्रीगोंदा तालक्यातील भानगाव शिवारात मृत...
नाशिकमध्ये ‘बर्ड फ्लू’च्या देखरेखीसाठी...नाशिक : राज्यातील विविध भागांमध्ये ‘बर्ड फ्लू’चा...
गोसेखुर्दच्या कामात हयगय नको : नितीन...नागपूर : तीन दशकांपेक्षा अधिक काळ लोटूनही...
ट्रॅक्टर मोर्चाबाबत आज सर्वोच्च...नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत...
पावसमधील आंब्याच्या तीन बागांमध्ये...रत्नागिरी : ढगाळ वातावरणामुळे आंबा बागांमध्ये...
स्थानिक वाण, प्रक्रिया पदार्थांना हवे ‘...स्थानिक वाण अधिक उत्पादनक्षम नसले, तरी त्यातील...
उसासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापरऊस पिकाची सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज कमी असली तरी...
पुण्यात भाजीपाला आवक घटली; दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कृषी कायदे शेतकऱ्यांना गुलाम करणारे :...नागपूर : केंद्रातील भाजप सरकारने लोकशाही आणि...
कोरोना लसीकरण क्रांतिकारक पाऊल : ...मुंबई : कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक...
सातारा जिल्ह्यात रब्बीची ९५ टक्के...सातारा : जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पेरणीची कामे...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत गहू...औरंगाबाद : तीन जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात...
सांगलीत कारखानदारांनी एफआरपीचा केला...सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश साखर...
बँकांनी पीक कर्जवाटप वेळेत पूर्ण करावे...नगर:  ‘‘जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी बँकांना...
सांगलीत ‘पीएम किसान’च्या अपात्र...सांगली : पंतप्रधान किसान योजनेतील जिल्ह्यातील ५...
सांगली जिल्हा बॅंकेसह १७३ संस्थांच्या ...सांगली : सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे...
नाशिकला मका खरेदीसाठी ५६ हजार क्विंटलचे... येवला : केंद्र शासनाच्या परवानगीनंतर ही...