agriculture news in marathi MPKV scientist transfers in controversy | Page 2 ||| Agrowon

राहुरी विद्यापीठाच्या बदली सत्रात एकीकडे ‘स्थगिती’; दुसरीकडे ‘मान्यता’

टीम अॅग्रोवन
बुधवार, 30 सप्टेंबर 2020

महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठात कनिष्ठ संशोधन सहायकांच्या बदल्यांना स्थगिती देणाऱ्या कुलगुरूंनी, दुसरीकडे कृषी सहायकांच्या बदल्यांचे आदेश काढल्याने शास्त्रज्ञांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

पुणे : महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठात कनिष्ठ संशोधन सहायकांच्या बदल्यांना स्थगिती देणाऱ्या कुलगुरूंनी, दुसरीकडे कृषी सहायकांच्या बदल्यांचे आदेश काढल्याने शास्त्रज्ञांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

कुलगुरू डॉ.के.पी.विश्वनाथ आता पुढील ४० दिवसात निवृत्त होणार आहेत. विद्यापीठातील नागरी सेवा मंडळाचे अध्यक्ष म्हणून डॉ.विश्वनाथा यांनी या बदल्या करीत संबंधित कर्मचाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्त करा, असे आदेश दिले आहेत.

“निवृत्त होण्याच्या आधी जबाबदार पदावरील अधिकारी शक्यतो मोठे निर्णय घेण्याचे टाळतात. त्यामुळे नव्या कुलगुरूंसमोर समस्या तयार होतात. राहुरीत मात्र निवृत्तीच्या जवळ पोचलेले कुलगुरू एका बाजूला बदल्या रद्द करतात आणि दुसऱ्या बाजूला बदल्यांचे आदेशही काढतात, हे संशयास्पद आहे,” असे मत एका माजी कुलगुरूंनी व्यक्त केले आहे.

तक्रार निवारण समितीकडे दाद मागू
“या बदल्या विनंती स्वरूपाच्या होत्या. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांची सोय झाली आहे. मात्र, अनेक कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्यांच्या अर्जांना कुलगुरूंनी केराची टोपली दाखवली आहे. विद्यापीठातील एका लॉबीने अनेक कर्मचाऱ्यांच्या बदल्या दाबून ठेवल्या आहेत. मात्र, विशिष्ट बदल्यांना मान्यता देत कुलगुरूंनी संशयाचे वातावरण तयार केले आहे. आम्ही विद्यापीठ तक्रार निवारण समितीकडे दाद मागणार आहोत,” अशी माहिती कर्मचाऱ्यांच्या गोटातून देण्यात आली. 


इतर अॅग्रो विशेष
जोरदार पावसाचा अंदाज पुणे ः राज्यात पुढील पाच ते सहा दिवस काही ठिकाणी...
राज्यांचा निर्धार नि केंद्राची माघार‘जीएसटी’ अंतर्गत राज्यांना द्यावयाच्या...
भुकेला भारतजागतिक भूक निर्देशांक-२०२० नुकताच प्रसिद्ध झाला...
बिजोत्पादनातून ‘गौरीनंदन’ची उलाढाल...नगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर (ता. नेवासा) येथील...
पाऊस ओसरला; शेतीकामांत अडथळे पुणे ः गेल्या दोन दिवसांत पावसाने काहीशी...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद २...कोल्हापूर: ‘स्वाभिमानी’ची यंदाची व १९ वी ऊस परिषद...
ओला दुष्काळ जाहीर करुन तातडीने मदत द्या...मुंबई: परतीच्या पावसाने मराठवाडा आणि पश्चिम...
बढत्या देताना गैरव्यवहाराकडे दुर्लक्ष पुणे: राज्याच्या कृषी खात्यातील अधिकाऱ्यांना...
उन्हाळ कांद्याची आवक घटली; दरात सुधारणा नाशिक: उन्हाळ कांद्याच्या मागील वर्षी मोठ्या...
`विकेल ते पिकेल’ संकल्पनेत भरिताची...जळगाव ः ‘विकेल ते पिकेल’ संकल्पनेत जिल्ह्यात...
‘जॉईंट ॲग्रेस्को’ ऑनलाइन होणार अकोला ः खरीप हंगामापूर्वी होणारी राज्यातील चार...
किसान रेल्वेने शेतमाल वाहतुकीवर ५०...नागपूर ः किसान रेल्वेच्या माध्यमातून...
मुख्यमंत्री ठाकरे, शरद पवार ...मुंबई: राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा...
जोरदार पावसाची शक्यता पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात...
पूरक व्यवसायातून स्वयंपूर्णतेचा धडादुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन आणि परसबागेतील...
डोळ्यातल्या पाण्याचे मोलऑ क्टोबरचा दुसरा पंधरवाडा चालू आहे. मूग, उडीद,...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात हजारो हेक्टर...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीचा...
मराठवाड्यातील पाऊस ओसरला, नुकसानीचे...औरंगाबाद  ः मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत...
पिकांच्या नुकसानीचे पंचनामे गतीने करा ः...मुंबई: अतिवृष्टी, वादळी पावसामुळे पिकांचे नुकसान...
हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी जिल्हानिहाय...परभणी ः राज्यात हंगाम सन २०२०-२१ मध्ये किंमत...