agriculture news in Marathi mrug season banana planting completed in Khandesh Maharashtra | Agrowon

खानदेशात मृग बहारातील केळी लागवड पूर्णत्वाकडे

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 जून 2020

आमच्या भागात केळी लागवड क्षेत्र स्थिर आहे. कंदांसह ऊतिसंवर्धित रोपांचा उपयोग शेतकरी लागवडीसाठी करीत आहेत. 
- विशाल महाजन, केळी उत्पादक, नायगाव, जि. जळगाव

जळगाव ः खानदेशात मृग बहार (जून व जुलैमध्ये लागवड) केळी लागवड पूर्णत्वाकडे आहे. यंदा क्षेत्र स्थिर राहणार असून, जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात सर्वाधिक १९ ते २३ हजार हेक्‍टरवर लागवड होण्याचा अंदाज आहे. 

जळगाव जिल्ह्यात मृग बहरातील केळी लागवड अधिक असते. त्यात रावेरपाठोपाठ यावल, मुक्ताईनगर, जामनेर, पाचोरा व काही प्रमाणात चोपडा तालुक्‍यातही लागवड केली जाते. तसेच नंदुरबारमधील शहादा, तळोदा, धुळ्यातील शिरपूर तालुक्‍यातही मृग बहार केळीची लागवड झाली आहे. खानदेशात मिळून ४० ते ४२ हजार हेक्‍टरवर मृग बहारातील केळी लागवडीचा अंदाज आहे. ‘कोरोना’च्या संकटात केळीचे दर दबावात आहेत.

यंदा ३०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मृग बहारातील केळीला मिळाला आहे. हे दर मागील वर्षाच्या तुलनेत कमी आहेत. कारण ‘कोरोना’मुळे उत्तर भारतातील बाजारांमध्ये केळीची पाठवणूक रखडत सुरू असतानाच तेथील किरकोळ विक्रीवरही परिणाम दिसत आहे. रमजानमध्ये दरात किंचित सुधारणा झाली होती, पुन्हा दर कोसळले. दरात सुधारणा दिसत नसली तरी पुढे ‘कोरोना’चे संकट दूर होऊन केळीला मागणी वाढेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

लागवडीनंतर केळीची काढणी १० महिन्यांत सुरू होते. यामुळे पुढील १० महिन्यांत ‘कोरोना’चे संकट दूर होईल, असा विश्‍वासही शेतकऱ्यांना असून, केळीची लागवड स्थिर आहे. मध्यंतरी ढगाळ व थंड वातावरणात रावेर, मुक्ताईनगर भागात ऊतिसंवर्धित केळी रोपांची लागवड वेगात झाली. परंतु जसे ऊन तापत आहे, तसा रोपे लागवडीवर परिणाम झाला आहे. 

कारण उष्णतेत रोपे तग धरण्याची प्रक्रिया मंद असते. नांग्या अधिक भराव्या लागतात, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जुलैच्या सुरवातीच्या आठवड्यातही लागवड सुरू राहील, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली.


इतर अॅग्रो विशेष
संगमनेर तालुका संघाकडून ५० टक्के...नगर: संगमनेर तालुका सहकारी दूध संघाने दूध...
उगाव येथे सामूहिक पातळीवर दशपर्णी अर्क...नाशिक: निफाड तालुक्यातील उगाव येथील श्री. श्री....
किसान क्रेडिट कार्डवर बिनव्याजी कर्ज...नाशिक: शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आर्थिक मदत करणे...
दुधाला दर नसल्याने, दुभती जनावरे ...सोलापूर ः दुधाला मागणी असूनही केवळ योग्य तो दर...
मराठा समाजाला विश्वासात घेणार : अशोक...मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत राज्य...
पुण्यात शेतमाल पुरवठा देखील बंद पुणे: कोरोनाची उफाळून आलेली साथ रोखण्यासाठी...
देशाच्या सूत निर्यातीत मोठी घट जळगाव ः कोरोना व इतर संकटांमध्ये देशातील सूत...
मराठवाड्यात २६ टक्के पीककर्ज वितरणऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा राज्यात बंद...औरंगाबाद: कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या...
राज्यात पावसाला पोषक हवामानपुणे : राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने...
जलसंधारण,शिक्षण अन् कृषी विकासाचा रचला...सुदृढ, आत्मनिर्भर समाज घडविणे या उद्देशातून जळका...
दुग्ध व्यवसाय ठरतोय शेतीला आधारपनवेल येथील बांधकाम व्यावसायिक अनिल लक्ष्मण...
कृषी आयुक्त दिवसेंची बदली, गायकवाड...मुंबई : राज्य सरकारने शनिवारी महत्त्वपूर्ण...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांना आरोपी नव्हे...पुणे : राज्यात खते, बियाणे, कीटकनाशकांची विक्री...
आनंदाची पातळी बदलतेय उत्पन्नांनुसारआजच्या जगामध्ये सामाजिक आर्थिक निकषांमध्ये वेगाने...
शेती क्षेत्रातील बदल टप्याटप्याने...नागपूर ः शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कृषी...
राज्यात कृषी सेवा केंद्रांचा बंद सुरूपुणेः सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
औरंगाबाद जिल्ह्यातील थेट शेतमाल विक्री...औरंगाबाद : कोरोना संकटामुळे शेतकरी ते ग्राहक...
रुतलेले अर्थचक्राने विकासालाही ‘ब्रेक’''मूडी'' या पतमानांकन संस्थेने अलीकडेच आपला अहवाल...
बेलखेडा होणार संत्रा उत्पादक गावरिसोड, जि. वाशीम ः तालुक्यातील दोन हजार लोकसंख्या...