पदव्युत्तर कृषी शाखेचे प्रवेश सोमवारपासून

कृषी पदव्युत्तर पदवीसाठी अजिबात उशीर झालेला नाही. सर्व्हरच्या अडचणींमुळे आम्ही पहिल्या टप्प्यात पदवीची प्रवेश प्रक्रिया संपविली असून ३० ऑगस्टपर्यंत पदव्युत्तरची प्रक्रियादेखील समाप्त केली जाईल. विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येणार नाही. - डॉ. हरिहर कौसडीकर, शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषद.
पदव्युत्तर कृषी शाखेचे प्रवेश सोमवारपासून
पदव्युत्तर कृषी शाखेचे प्रवेश सोमवारपासून

पुणे: राज्याच्या चारही कृषी विद्यापीठांमधील पदव्युत्तर प्रवेशाची प्रक्रिया सोमवारपासून (ता. ३०) सुरू करण्यात येणार आहे. पदव्युत्तरसाठी मार्चमध्ये घेण्यात आलेल्या सामाईक प्रवेश (सीईटी) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आले होते. मात्र, यंदा कोणतेही कारण जाहीर न करता प्रवेश प्रक्रिया लांबल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे, असे विद्यार्थी प्रतिनिधींचे म्हणणे आहे.  महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परीक्षा मंडळामार्फत २०१८-१९ या शैक्षणिक वर्षासाठी सीईटी घेण्यात आली होती. त्यासाठी १६ हजार ८५८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यानंतर लगेच पदवीची प्रवेश प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, आता परिषदेने वेळापत्रक जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होणार आहे.  खासगी महाविद्यालयांमध्ये पदवीप्रमाणे पदव्युत्तर शिक्षण दिले जात नाही. त्यामुळे विद्यार्थी पूर्णतः सरकारी महाविद्यालयांवर अवलंबून असतात. सध्या डॉ. बाळासाहेब सांवत कृषी विद्यापीठ, दापोली, डॉ.  पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अखत्यारित ११ महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर शिक्षणाची सुविधा आहे. एमएस्सीमध्ये कृषीसाठी ८८५ जागा असून उद्यानविद्या १३४, वनशास्त्र २१, मत्सशास्त्र २८, अन्नतंत्रज्ञान १५, जैवतंत्रज्ञान ३२, एमबीए ९५, अभियांत्रिकी ७०, गृहविज्ञान १२ तर काढणीपश्चात व्यवस्थापनासाठी ३० जागा असून एकूण १३२२ जागांसाठी प्रवेश दिला जाईल.  पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश मिळण्यासाठी पदवीची तात्पुरती गुणपत्रकेदेखील विविध विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना दिलेली आहेत. गेल्या शैक्षणिक वर्षात १० जुलैला पदव्युत्तरचे प्रवेश सुरू होऊन २१ जुलैपर्यंत प्रक्रिया संपविण्यात आली होती. त्यामुळे १२ ऑगस्टपासून महाविद्यालयांमध्ये अध्यपनाचे काम सुरू झाले होते. विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश अर्ज, वेळापत्रक व नियमावली www.mcaer.org व maha-agriadmission.in या संकेतस्थळांवर मिळू शकते, असे परिषदेच्या सूत्रांनी स्पष्ट केले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com