सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे एक कोटीचे नुकसान

सोलापूरः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व बार्शी विभागातील वीजयंत्रणेला गेल्या काही दिवसांमध्ये मुसळधार पाऊस, पूरपरिस्थितीचा मोठा फटका बसला आहे.
MSEDCL loses Rs 1 crore due to rains in Solapur district
MSEDCL loses Rs 1 crore due to rains in Solapur district

सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व बार्शी विभागातील वीजयंत्रणेला गेल्या काही दिवसांमध्ये मुसळधार पाऊस, पूरपरिस्थितीचा मोठा फटका बसला आहे. या तिन्ही विभागात मिळून महावितरणचे जवळपास एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी दिली. महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे ८० टक्के वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश आल्याचेही त्यांनी सांगितले.

या आपत्तीदरम्यान, १४५ गावांमधील वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. सुमारे ४०७ लघु व उच्चदाबाचे वीजखांब वाहिन्यांसह कोसळले. त्यामुळे १२ उपकेंद्र, ७६ उच्चदाब वीजवाहिन्या व दोन हजार ४१४ रोहित्रांचा वीजपुरवठा बंद पडला होता. परिणामी, ३३ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र, ४८ तासांच्या कालावधीमध्ये ८० टक्के घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांचा, तर ७८ टक्के कृषीपंप व इतर ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात महावितरणला यश आले. 

माळशिरस तालुक्‍यातील पिलीव, मळोली, धानोरे, शेंडचिंचोली, तोंडले, बोंडले या गावांच्या परिसरात दोन तासांच्या कालावधीत सुमारे २२० मिलीमीटर पाऊस झाला. यामुळे वीजयंत्रणा जमीनदोस्त झाली आहे. पंढरपूर तालुक्‍यातील भंडीशेगाव, सुपली, पळशी, उपरी, वाडीकुरोली या गावांत पुराच्या पाण्यामुळे वीजयंत्रणा कोसळली आहे. 

वीजपुरवठ्यासाठी अभियंते प्रयत्नशील

वीजयंत्रणा उभारण्यासोबतच सर्व वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे कार्यकारी अभियंता संजय गवळी (पंढरपूर), अनिल वडर (अकलूज), दीपक लहामगे (बार्शी) तसेच अभियंता, कर्मचारी आणि कंत्राटदारांचे कर्मचारी प्रयत्न करीत आहेत, असेही पडळकर म्हणाले.

कृषिपंपांचा पुरवठा सुरळीत

कृषीपंपासह इतर २० हजार ४५५ पैकी १५ हजार ८२५ (७७.३६ टक्के) ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. सध्या पूरपरिस्थिती, चिखल, साहित्य नेण्यासाठी मार्ग बंद, झाडांची पडझड आदींमुळे प्रामुख्याने कृषीपंपांचा वीजपुरवठा सुरू करण्यात विलंब होत आहे, असेही सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com