agriculture news in marathi MSEDCL is responsible for burning sugarcane in Satana taluka | Agrowon

सटाणा तालुक्यातील ऊस जळण्यास महावितरणच जबाबदार

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

नाशिक : सटाणा तालुक्यातील डांगसौंदाणे येथील दोन शेतकऱ्यांचा नऊ एकर ऊस जळून खाक झाला होता. त्यानुसार ऊस जळिताच्या घटनेस महावितरण कंपनीच जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. 

नाशिक : सटाणा तालुक्यातील डांगसौंदाणे येथील दोन शेतकऱ्यांचा नऊ एकर ऊस जळून खाक झाला होता. याबाबत उद्योग, ऊर्जा कामगार विभाग कार्यालयाच्या विद्युत निरीक्षक कार्यालयाने पंचनामे करून चौकशी केली. त्यानुसार ऊस जळिताच्या घटनेस महावितरण कंपनीच जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याबाबत चौकशी अहवाल देण्यात आला आहे. आता जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? याची प्रतीक्षा आहे. 

सटाणा तालुक्यातील डांगसौंदाणे येथील गट नं.३२३/०१,३२३/०२, ३२३/०३,३२६ येथील शेतकरी दिगंबर धर्मा बोरसे, योगेश दिगंबर बोरसे, विमलबाई बोरसे, वंदना साहेबराव काकुळते यांचा ऊस जळाला होता. या प्रकरणाची चौकशी  भारतीय विद्युत अधिनियम २००३ च्या कलम १६१ नुसार प्राधिकृत केल्याप्रमाणे ४ नोव्हेंबर रोजी विद्युत निरीक्षक कार्यालयातर्फे करण्यात आली. त्यानुसार २० लाखांपर्यंत नुकसान झाल्याचा अंदाज आहे. 

घटनास्थळी विमलबाई बोरसे यांच्या शेतातून ३ फेजच्या ३ वायरची लघुदाब वाहिनी गेली आहे. या शेतामध्ये जुनी लघुदाब वाहिनी आहे. वाहकांमधील अंतर कमी होते. दोन खांबांमधील अंतर जास्त होते. तसेच रोहित्राच्या वितरण पेटीतील फ्युजतार योग्य क्षमतेची बसविण्यात आलेली नव्हती. त्यामुळे अंदाजे दुपारी ०३:३० वाजेच्या सुमारास लघुदाब वाहिनीतील ‘वाय फेज व ''बी'' फेज वाहकांमध्ये घर्षण होऊन त्यातील ‘बी’ फेज वाहक तुटून खाली पडला. यावेळी घर्षण होऊन ठिणग्या उसावर पडून आग लागल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

अद्याप विद्युत निरीक्षक कार्यालयाचा अहवाल प्राप्त झाला नाही आहे. मात्र, चौकशी अहवाल आल्यानंतर जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. शिवाय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव नुकसानभरपाई देण्याचा प्रयत्न राहील. 
- रमेश सानप, अधीक्षक अभियंता, महावितरण कंपनी, मालेगाव. 

ऊस जळीत घटनेस महावितरण जबाबदार आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने लवकर नुकसानीची नुकसान भरपाई द्यावी.
- दिगंबर बोरसे, नुकसानग्रस्त शेतकरी


इतर बातम्या
शेतकरी मागण्यांवर ठाम; ट्रॅक्टर रॅलीही...नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी दिल्लीत ट्रॅक्‍टर...
बर्ड फ्लू नुकसानग्रस्त पोल्ट्री...नागपूर ः राज्यात ११ जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूचा...
एक लाख शेतकऱ्यांची तूर विक्रीसाठी...अकोला ः राज्यात या हंगामात उत्पादित तूर खरेदीला...
कापूस उत्पादकतावाढीसाठी ‘सीआयसीआर’चा ॲ...नागपूर ः जगाच्या तुलनेत भारताची आणि त्यातही...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष हंगामास उशीरसांगली ः जिल्ह्यात अगदी क्वचितच आगाप छाटणी...
आजरा घनसाळसह तूरडाळ, घेवडा मिळणार...कोल्हापूर : पारंपरिक विक्री व्यवस्थेच्या पलीकडे...
थंडीत चढ-उतार सुरुच पुणे ः हिमालय आणि पश्चिम बंगालच्या परिसरात कमी...
खांबापासून ३० मीटरच्या आतील कृषिपंपांना...पुणे ः राज्यातील शेतकऱ्यांना कृषिपंपांसाठी...
ट्रक वाहतूकदारांचे दोन हजार कोटींचे...अमरावती : नवीन कृषी कायदे मागे घेण्यासाठी दिल्लीत...
गव्यांच्या कळपाकडून केळी बागांचे नुकसानसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील विलवडे मळावाडी (ता....
गोरेवाडा प्राणिसंग्रहालय नामकरणाला विरोधनागपूर ः नागपूर शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या...
औरंगाबाद विभागात उसाचे ४७ लाख टन गाळपऔरंगाबाद : येथील प्रादेशिक सहसंचालक (साखर)...
वीज तोडल्यास गाठ आमच्याशी : कृती समितीकोल्हापूर ः कोरोना काळातील वीजबिले माफ करण्याची...
बीटी कापूस बियाण्यातील शेतकऱ्यांची...बुलडाणा ः कापूस उत्पादकांना कमी खर्चात अधिक...
अण्णांचे दिल्लीऐवजी राळेगणसिद्धीत आंदोलननगर : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नवी...
उत्पादनवाढीसाठी योग्य तंत्रज्ञान वापरा...सोलापूर ः हरभरा, तूर या कडधान्य पिकाखालील...
गावठाण भूमापन कामाचे ड्रोनद्वारे...नांदेड : ‘‘भूमी अभिलेख विभाग व भारतीय सर्वेक्षण...
जमिनींचा लिलाव रोखा ; शेतकरी संघटनेची...नाशिक : शेतकऱ्यांचे चोहोबाजूंनी नुकसान झाले आहे....
सातारा जिल्ह्याची वीजबिल थकबाकी ४४...नगर ः खरीप हंगामात तयार झालेल्या तुरीला बाजारात...
केंद्र सरकारकडून कृषी कायदांना...नवी दिल्ली ः दिल्लीच्या सीमांवर कृषी...