सोलापूर जिल्ह्यातील वीजपुरवठा पूर्ववत

सोलापूर : अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे विस्कळित झालेला वीजपुरवठा आता पूर्ववत सुरु झाला आहे.
MSEDCL succeeds in restoring power supply in Solapur district
MSEDCL succeeds in restoring power supply in Solapur district

सोलापूर : अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे विस्कळित झालेला वीजपुरवठा आता पूर्ववत सुरु झाला आहे. या आपत्तीमुळे बाधित झालेल्या ३२५ गावांपैकी दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाड वगळता, आतापर्यंत सर्व गावांचा वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. जवळपास १ लाख १६ हजार २०५ ग्राहकांना त्याचा फटका बसला होता.

गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार परतीच्या पावसामुळे राज्यात सर्वाधिक नुकसान सोलापूर जिल्ह्यात झाले आहे. उजनी धरणातून विसर्ग वाढल्यामुळे व सर्वच नदी-नाले दुथडी भरून वाहिल्याने जिल्ह्यातील ५१ वीज उपकेंद्रे बाधित झाली होती. यामध्ये दोन ठिकाणी अतिउच्चदाबाचे मनोरे कोसळल्याने १२ वीज उपकेंद्रे बंद पडली. परंतु, गेल्या काही दिवसांत पर्यायी मार्गाने ती सुरु करण्यात यश आले. सहा उपकेंद्रे बंद असली, तरी त्यावरील गावठाण वाहिन्यांचा वीजपुरवठा पर्यायी मार्गाने सुरु केला आहे. 

बाधित झालेल्या गावांची संख्या ३२५ पर्यंत गेली होती. पाणी, ओसरताच टप्प्या-टप्प्याने ३२४ गावांचा वीजपुरवठा पूर्ववत केला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाड नदी पलीकडे असल्याने आणि या भागातील पूरही अद्याप ओसरला नसल्याने अडचण आहे. पण, त्या गावाचाही दोन-तीन दिवसात वीजपुरवठा सुरळीत होईल, असे सांगण्यात आले.

जिल्ह्यात १८८२ विजेचे खांब कोसळले आहेत. ८७०७ रोहित्रे बाधित झाली आहेत. ही सर्व रोहित्रे सुरु करण्यासाठी लागणारे ऑइल मुख्यालयाने पुरेशा प्रमाणात दिले आहे. 

शेतीच पाण्यात, विजेची मागणी कमी

आतापर्यंत ५४४८ रोहित्रे सुरु करण्यात आली आहेत. उर्वरित रोहित्र सुरु करण्यासाठी पात्रातील पाणी व नदीकाठची दलदल कमी होणे गरजेचे आहे. बंद असलेली बहुतांश रोहित्रे शेतीची आहेत. शेतीच पाण्यात गेल्याने तिथे विजेची तातडीने मागणीही नाही. महावितरणच्या दीडशेहून अधिक पथकांनी ही कामे पूर्ण केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com