नगरमध्ये महावितरणच्या पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण सुरू 

भरलेल्या वीजबिलाच्या रकमेतून सदर ग्रामपंचायत क्षेत्रातील कृषी वीजयंत्रणेचे विस्तारीकरण व सक्षमीकरणासाठी रोहित्राची क्षमता वाढ करण्यात येत असून, ६३ केव्हीए ऐवजी १०० केव्हीएचे रोहित्र बसविण्यास नगर तालुक्यात सुरुवात झाली आहे.
नगरमध्ये महावितरणच्या  पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण सुरू MSEDCL in the town Infrastructure empowerment underway
नगरमध्ये महावितरणच्या  पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण सुरू MSEDCL in the town Infrastructure empowerment underway

नगर : कृषिपंप वीज धोरण २०२०च्या अंमलबजावणीमुळे गावागावांमध्ये वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीचे प्रयत्न सुरू आहेत. थकबाकीमध्ये तब्बल ६६ टक्क्यांपर्यंत सवलत मिळवीत नगर तालुक्यातील १२ हजार १४५ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवत १० कोटी ८९ लाख रुपयांची थकबाकी भरली. भरलेल्या वीजबिलाच्या रकमेतून सदर ग्रामपंचायत  क्षेत्रातील कृषी वीजयंत्रणेचे विस्तारीकरण व सक्षमीकरणासाठी रोहित्राची क्षमता वाढ करण्यात येत असून,  ६३ केव्हीए ऐवजी १०० केव्हीएचे रोहित्र बसविण्यास नगर तालुक्यात सुरुवात झाली आहे.  

राज्यातील कृषी ग्राहकांना नवीन वीजजोडणी, दिवसा ८ तास सौर कृषी वाहिनीद्वारे वीजपुरवठा, कृषी ग्राहकांना थकबाकीत सूट देऊन मोठा दिलासा, कृषी वीजपुरवठा क्षेत्रात ग्रामपंचायती व कृषी ग्राहकांच्या पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण या उद्देशाने राज्य शासनाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरण-२०२० अंतर्गत महाकृषी अभियानाची महावितरणद्वारे अंमलबजावणी केली जात आहे. गावातून वसूल झालेल्या थकबाकीपैकी ३३ टक्के रक्कम त्याच गावच्या वीज पुरवठा विषयक पायाभूत सुविधांवर खर्च होणार आहे. अधिक गावांचा समावेश असलेल्या सर्कलमध्ये होणाऱ्या थकबाकी वसुलीपैकी ३३ टक्के रक्कम त्याच सर्कलच्या वीज पुरवठा विषयक पायाभूत सुविधावर खर्च करण्याची अतिशय महत्त्वपूर्ण तरतूद या धोरणात आहे. 

या योजनेतून नगर तालुक्यातील २५ हजार ७७४ कृषीपंप ग्राहकांकडे २९६ कोटी ५७ लाख रुपये थकबाकी आहे. त्यातील १९९ कोटी  १६ लाख रुपये रक्कम या योजनेअंतर्गत माफ होणार असून, उर्वरित ९७ कोटी ४१ लाख रुपये कृषीपंप ग्राहकांनी भरावयाची आहे.  तालुक्यातील शेतकऱ्यांनी वीजबिल भरण्याला प्रतिसाद देत जवळपास १२ हजार १४५ ग्राहकांनी १० कोटी ८९ लाख रुपयांचे वीजबिल भरले. विस्तारीकरण व सक्षमीकरणासाठी रोहित्राची क्षमता वाढ करण्यात येत असूनतालुक्यातील चास, हिवरेबाजार, देहेरे, चिंचोडी  पाटील, नांदगाव, जेऊर, पोखर्डी, शेंडी, पिंपळगाव माळवी, वाळुंज, गुंडेगाव व वाळकी या गावांमध्ये या योजनेमध्ये कृषी थकबाकीचा भरणा मोठ्या प्रमाणात झाला आहे.  या नुसार तालुक्यातील चास गावातील आगरकर मळा रोहित्र  तसेच हिवरेबाजार गावातील पादीर वस्ती या रोहित्राची  ६३ केव्हीए ऐवजी १०० केव्हीएचे क्षमता वाढ करण्यात  आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com