महावितरणच्या आदेशामुळे वीज ग्राहक धास्तावले

महावितरणचे अनेक ग्राहक मागील काही महिन्यांपासून थकीत आहेत. आता ही थकीत रक्कम न भरल्यास थेट वीजजोडणी तोडण्याची कारवाई महावितरण करणार आहे. त्यामुळे महावितरणचे थकीत ग्राहक धास्तावले आहेत.
महावितरणच्या आदेशामुळे वीज ग्राहक धास्तावले MSEDCL's order frightened power consumers
महावितरणच्या आदेशामुळे वीज ग्राहक धास्तावले MSEDCL's order frightened power consumers

सोलापूर : कोरोनाच्या साथीमुळे घटलेले आर्थिक उत्पन्न, पगारात झालेली कपात, अनेकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील महावितरणचे अनेक ग्राहक मागील काही महिन्यांपासून थकीत आहेत. आता ही थकीत रक्कम न भरल्यास थेट वीजजोडणी तोडण्याची कारवाई महावितरण करणार आहे. त्यामुळे महावितरणचे थकीत ग्राहक धास्तावले आहेत.

कोरोनाच्या संकटामुळे शहरी भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेकांचे व्यवसाय बंद होते. नोकऱ्या गेल्यामुळे शहरी मध्यवर्गीय ंमाणसाची क्रयशक्तीच कमी झाली होती. त्याचा परिणाम म्हणून आर्थिक उलाढाल मंदावली होती. त्यामुळे शहरांमधील अनेक ग्राहकांना वीजबिल भरणे शक्य नव्हते. त्यामुळे राज्यातील हजारो ग्राहक थकीत झाले होते. आता महावितरणकडे विजेची मागणी वाढली आहे. मात्र वाढत्या थकबाकीच्या पार्श्वभूमीवर विजेची मागणी आणि पुरवठ्यामध्ये महावितरणला ताळमेळ घालता येईना झाला आहे. वीजखरेदीचा आर्थिक ताळमेळ, देखभाल व दुरुस्तीसह इतर खर्च भागविण्यासाठी अडचण निर्माण झाली असून, यासाठी थकबाकीदारांनी वीजबिलाची रक्कम भरावी, अन्यथा वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला आहे. एकट्या सोलापूर जिल्ह्यात २९८ कोटी ६० लाख रुपयांची वीजथकबाकी आहे.  गेल्या ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत तीन महिन्यांत पश्चिम महाराष्ट्रातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व सार्वजनिक सेवा वर्गवारीतील थकबाकीदारांच्या संख्येत तब्बल १४ लाख ९० हजार ३०० ग्राहकांची भर पडली असून, थकबाकी देखील ६९३ कोटी २ लाखांनी वाढली आहे. सद्य:स्थितीत पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये एकूण ४७ लाख ३० हजार ९०० वीजग्राहकांकडे २३५९ कोटी १३ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यात एकट्या सोलापूर जिल्ह्यात अकृषक विभागातील ६ लाख ६३ हजार ६३० वीजग्राहकांकडे २९८ कोटी ६० लाख रुपयांची थकबाकी आहे. इतक्या मोठ्या प्रमाणातील थकीत रकमेमुळे महावितरणही अडचणीत आली आहे. सुलभ हप्त्याची सोय शेतकरी ग्राहक वगळता उर्वरित सर्व वर्गवारीमधील उच्च व लघुदाब ग्राहकांना चालू वीजबिलाची रक्कम भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सोय उपलब्ध आहे. त्यासाठी डाऊन पेमेंट करण्याची गरज नाही. तसेच ज्या ग्राहकांचा वीजपुरवठा सध्या सुरू आहे. मात्र वीजबिल थकीत आहे, अशा तसेच तत्पुरता किंवा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या थकबाकीदार ग्राहकांनी ३० टक्के डाउन पेमेंट करून सुलभ हप्त्यांच्या योजनेत सहभाग घेतल्यास त्यांना सुलभ हप्त्यांची सोय उपलब्ध आहे. सोबतच खंडित झालेली वीजजोडणी पुनर्जोडणी शुल्क भरून किंवा सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाल्यास नवीन वीजजोडणी घेण्याची सोय आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com