कच्च्या जूटला ३७०० रुपये हमीभाव

जूट
जूट

नवी दिल्ली ः कच्च्या जूटच्या हमीभाव वाढीला केंद्राने मंजुरी दिली आहे. चांगल्या प्रतीच्या कच्च्या जूटला २०१८-१९ मध्ये क्विंटलमागे २०० रुपये वाढ करण्यात आली आहे. यंदा प्रतिक्विंटल ३७०० रुपये हमीभाव देण्याचे जाहीर केले आहे. २०१७-१८ मध्ये जूटला ३५०० रुपये हमीभाव होता.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत २०१८-१९ च्या हंगामात कच्च्या जूटच्या हमीभावात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने शेतमालाला हमीभाव देण्यासाठी आणलेल्या A2+FL या सूत्रानुसार कच्च्या जूटला देण्यात आलेला हमीभाव हा उत्पादन खर्चावर ६३.३ टक्के परतावा मिळेल. जूटचा हमीभाव जाहीर करताना शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य व रास्त दर मिळावा, याचा विचार करण्यात आला आहे; तसेच हमीभाव वाढविल्याने शेतकरी जूटच्या शेतीत गुंतवणूक वाढवतील. त्यातून जूटची उत्पादकता वाढेल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्नही; तसेच देशात जूटचे उत्पादन वाढून मागणी भागविता येईल. कच्च्या जूटच्या हमीभावात कृषीमूल्य आणि किंमत आयोगाच्या (सीएसीपी) शिफारशीनंतर वाढ करण्यात आली आहे. सीएसीपी कोणत्याही उत्पादनाचा हमीभाव ठरविताना अनेक घटक लक्षात घेते. शेतमालाचा उत्पादन खर्च, एकूण मागणी आणि पुरवठा, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय किमती, पर्यायी पिकाच्या किमतीचे गुणोत्तर, कृषी आणि अकृषीक क्षेत्रातील व्यापाराच्या अटी आणि त्या पिकाच्या हमीभावाच्या एकूण अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम आदी घटक विचारात घेतले जातात. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com