agriculture news in marathi Much water in the scarcity-hit areas of Khandesh | Agrowon

खानदेशातील टंचाईग्रस्त भागात बऱ्यापैकी पाणी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 मे 2020

जळगाव : खानदेशात टंचाईच्या झळा बसणाऱ्या धुळ्यातील साक्री, शिरपुरातील आदिवासी भाग, जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, पारोळा, भडगाव, चोपड्यातील आदिवासी भागात जलसाठे बऱ्यापैकी आहेत. त्यामुळे टंचाई कमी आहे. मागील वर्षाच्या तुलनेत टंचाई अल्प प्रमाणात असल्याने प्रशासनाची डोकेदुखीदेखील कमी झाली आहे. 

जळगाव : खानदेशात टंचाईच्या झळा बसणाऱ्या धुळ्यातील साक्री, शिरपुरातील आदिवासी भाग, जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, पारोळा, भडगाव, चोपड्यातील आदिवासी भागात जलसाठे बऱ्यापैकी आहेत. त्यामुळे टंचाई कमी आहे. मागील वर्षाच्या तुलनेत टंचाई अल्प प्रमाणात असल्याने प्रशासनाची डोकेदुखीदेखील कमी झाली आहे. 

जळगाव जिल्ह्यात अमळनेर, पारोळा, जळगाव, चाळीसगाव, चोपडा तालुक्‍यातील आदिवासी भागात टंचाई असते. यंदा, मात्र टंचाई आराखडा निम्म्या खर्चाचा तयार झाला होता. सुमारे २१ कोटींची तरतूद केली होती. सध्या जिल्ह्यात सुमारे सात टॅंकर सुरू आहेत. 

साक्री तालुक्‍यात यंदा भीषण पाणीटंचाईची स्थिती उद्‌भवलेली नाही. ज्या ग्रामपंचायतींकडून याबाबत प्रस्ताव आले आहेत, अशा दोन ठिकाणी सध्या टॅंकरने पाणी पुरवले जात आहे. १४ गावांमध्ये विहिरी अधिग्रहण केल्या आहेत. 

तालुक्‍यातील मध्यम प्रकल्पांमध्येही समाधानकारक जलसाठा आहे. अशातच संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने २०१९-२० साठी ऑक्‍टोबर २०१९ पासूनच कृती आराखडा तयार करत नियोजन केले होते. एप्रिल ते जून २०२० या कालावधीसाठी १५ गावे व २१ वाड्यांसाठी सुमारे ३६ विविध उपाययोजनांचे नियोजन केले होते. 

चोरवड पैकी धसकलपाडा, बोपखेल पैकी भिलखडी, देवजीपाडा, तसेच देवजीपाडापैकी तोरसपाडा, लगडवाड पैकी नवागाव, कालटेक, कालटेक पैकी पचाळे, वाकी पैकी चाफाबंद, कोर्डे, शेंदवड पैकी केवडीपाडा व मावजीपाडा, पापडसोंडा पैकी भुरीविहीर, आमखेल व प्रतापपूर आदी १४ ठिकाणी विहीर अधिग्रहण केल्या. पेरेजपूर पैकी सालटेक, डोमकाणी पैकी मळगाव व दिवाणेमाळ या दोन ठिकाणी सध्या टॅंकर सुरू आहेत. 

शिरपुरात सात पाड्यांत उपाययोजना 

शिरपूर तालुक्‍यातील सहा पाडे व एका गावात उपाययोजना केल्या आहेत. डिसेंबरमध्ये पंचायत समितीने संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला होता. चार ग्रामपंचायतींअंतर्गत असलेल्या सहा पाड्यांसह एका गावात पाणीटंचाई जाणवू शकेल, असे निश्‍चित करण्यात आले. 

टेंभेपाडा ग्रामपंचायतीअंतर्गत नवापाडा, बुडकीविहीर व चोंदीपाडा येथे पाणीटंचाईची शक्‍यता आहे. तेथे विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. चांदपुरी गावातही पाणीटंचाईची शक्‍यता लक्षात घेऊन विहीर अधिग्रहित केली आहे. दुर्गम भागातील गुऱ्हाळपाणी ग्रामपंचायतींतर्गत थुवानपाणी व प्रधानदेवी येथे, तसेच वरझडी ग्रामपंचायतींतर्गत अंबरपाडा येथे विशेष उपाययोजना केल्या आहेत. 
 
 


इतर ताज्या घडामोडी
पेरणीसाठी ‘बीबीएफ’ तंत्राचा वापर करा :...औरंगाबाद : ‘‘बीबीएफ टोकण यंत्राचा वापर वेगवेगळी...
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बॅंका पीक...जळगाव ः केंद्र व राज्य सरकार, प्रशासनातील वरिष्ठ...
हतनूर धरणाची साठवण क्षमता घटलीभुसावळ, जि. जळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख सिंचन...
शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा...जालना  : ‘‘शेतकऱ्यांनी शेतीत आधुनिक...
रिसोड बाजार समितीत हळदीची दोन दिवस खरेदीअकोला ः गेल्या काही वर्षांत वाशीम तसेच अकोला...
खानदेशात सर्वदूर पावसाची हजेरीजळगाव ः खानदेशात पेरणी ८८ टक्‍क्‍यांवर पोचली असून...
परभणीत २५ हजारांवर शेतकऱ्यांची कापूस...परभणी  : ‘‘राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन...
रत्नागिरी जिल्ह्यातील भाजीपाला,...रत्नागिरी : कोरोना टाळेबंदीत जिल्ह्यातील महिला...
सांगली जिल्ह्यात पावसाअभावी पेरणी वाया...सांगली : जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यांपासून...
नगर जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर पेरानगर ः यंदा रोहिणी, मृग, आर्द्रा नक्षत्रांमध्ये...
परभणी जिल्ह्यात ७४.४३ टक्के पेरणीपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात शुक्रवार...
अकोला जिल्ह्यात पीक कर्जापासून ५२ टक्के...अकोला ः खरीप हंगामाला सुरुवात झाली असून,...
पाऊस नसल्याने संरक्षित पाण्यावर भातलागवडनाशिक : जिल्ह्यातील अतिपर्जन्य छायेखालील इगतपुरी...
बियाणे भरपाई दिलेल्या शेतकऱ्यांची नावे...नागपूर ः आपल्या सत्ताकाळात निकृष्ट बीटी...
जळगाव, धुळ्यात युरियाची टंचाई कायमधुळे ः जळगाव व धुळे जिल्ह्यांत युरियासह १०.२६.२६...
महाजॉब्स संकेतस्थळाच्या माध्यमातून...मुंबई : देशातील सर्वात मोठे प्लाझ्मा सेंटर असो की...
केंद्राकडून शेतकऱ्यांच्या मानगुटीवर पाय...कऱ्हाड, जि. सातारा ः अर्थव्यवस्थेला शेतकरी राजा...
करमाळ्यातील आदिनाथ कारखाना...करमाळा, जि. सोलापूर : करमाळा तालुक्‍यातील आदिनाथ...
हॉटेल्स, लॉज उद्यापासून सुरू होणारमुंबई : तब्बल साडेतीन महिन्यांनंतर ८ जुलैपासून...
जनहितचे धरणे अन् तत्काळ शेतकऱ्यांच्या...सोलापूर  ः मोहोळ तालुक्यातील ऑक्टोबर -...