agriculture news in marathi Mud of marigold flowers due to rain in Igatpuri, Sinnar taluka | Agrowon

इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसामुळे झेंडूच्या फुलांचा चिखल

टीम अॅग्रोवन
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

नाशिक : दसरा व दिवाळी सणाची बाजारपेठ समोर ठेऊन इगतपुरी व सिन्नर तालुक्यातील शेतकरी झेंडूची लागवड करतात. मात्र, चालू वर्षी परतीच्या पावसाचा फटका बसला आहे.

नाशिक : दसरा व दिवाळी सणाची बाजारपेठ समोर ठेऊन इगतपुरी व सिन्नर तालुक्यातील शेतकरी झेंडूची लागवड करतात. मात्र, चालू वर्षी परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या परतीच्या पावसामुळ झेंडू लागवडी जमीनदोस्त झाल्या आहेत. त्यामुळे फुलांचा चिखल झाला आहे. नुकसानीमुळे उत्पादन ९० टक्क्यांपर्यंत घटल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्याच्या पूर्व साकूर, नांदगाव, पिंपळगाव घाडगा, पिंपळगाव डुकरा, शेणीत, सिन्नर तालुक्यातील विंचुरी दळवी, बेलू, आगास खिंड, मोह या भागात पावसाने फूल उत्पादकांना फटका बसला. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे झाडे आडवी झाली आहेत. त्यामुळे काही ठिकाणी फुलांची कुज झाली.  माती लागून डाग पडले आहेत. त्यामुळे फुलांची विक्री करताना अडचणी येत आहेत. 

एकीकडे बाजारात आवक घटली असून घाऊक बाजारात ८० ते १०० रुपयांपर्यंत, तर किरकोळ बाजारात १२० ते २५० रुपयांपर्यंत दर आहेत. सणासुदीला झेंडूचा रंग शेतकऱ्यांसाठी फिका पडल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, पूर्व भागात चांदवड, निफाड, नाशिक व दिंडोरी तालुक्यात नुकसान कमी आहे. 

मोठ्या मेहनतीने फुलांचे उत्पादन घेतले. पावसामुळे फुलांची नासाडी झाली. त्यामुळे दसरा बाजार हातातून गेला आहे. दरात तेजी आहे. मात्र, फुले नसल्याने पदरी काहीच पडणार नाही. फुले निघणार नसल्याने काहीच फायदा नाही.
- सुरज सहाणे, झेंडू उत्पादक, साकूर, ता. इगतपुरी

  •     पावसामुळे लागवडी आडव्या
  •     सततच्या पावसामुळे फुलांची कुज
  •     रोपे जमीनदोस्त झाल्याने फुलांचा          चिखल 
  •     उत्पादनात ९० टक्के घट 

इतर बातम्या
रत्नागिरी, संगमेश्‍वरसाठी भात खरेदी सुरूरत्नागिरी  : रत्नागिरी व संगमेश्‍वर...
चक्रीवादळांचा तडाखा यंदा वाढलापुणे : चक्रीवादळ निर्मिती नैसर्गिक असली, तरी...
खानदेशात यात्रांअभावी अनेकांवर...सोनगीर, जि. धुळे  : खानदेशात पावसाळा वगळता...
नाशिक जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीसाठी...गिरणारे, जि. नाशिक : खरीप हंगामातील भात, भुईमूग,...
खांबाळे, पडवणे येथील आंबा, काजूची ६००...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील खांबाळे (ता....
बोडखा येथे ‘स्वाभिमानी’चे झाडावर...बुलडाणा : केंद्र सरकारने पारित केलेले शेतकरी...
औरंगाबादमध्ये केंद्राच्या कृषी...औरंगाबाद : केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी...
खानदेशात सव्वा लाख हेक्टरवर पेरणीजळगाव : खानदेशात मक्याची लागवड सुरूच आहे. रब्बी...
परभणी जिल्ह्यात कापूस विक्रीच्या...परभणी : ‘‘राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन...
नाशिक विभागात रोज एक लाख टन उसाचे गाळपनगर  ः नाशिक विभागातील ३२ पैकी २५ साखऱ...
औरंगाबाद, नगर जिल्ह्यात कापसाची ३४ हजार...औरंगाबाद : राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्या...
कृषी कायद्यांविरोधात साताऱ्यात धरणेसातारा : शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्यासाठी...
साखरेची ‘एमएसपी’पेक्षा कमी किमतीने मागणीकोल्हापूर : देशांतर्गत बाजारात साखरेची विक्री...
जालना जिल्ह्यात दहा हजार क्‍विंटलवर...जालना : ‘‘जिल्ह्यात मक्याची किमान आधारभूत...
काजू उत्पादकांना दिलासामुंबई : महाविकास आघाडी सरकारने राज्यातील काजू...
का येताहेत चक्रीवादळे? भारताच्या पूर्व भागात असलेला बंगालचा उपसागर,...
कृषी कायद्यांविरोधात राज्यात...पुणे ः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी आणि पणन...
किसान समन्वय समितीचा अकोले येथे मोर्चा नगर ः केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना...
महिनाभर जमीन आरोग्य सुधार अभियानऔरंगाबाद : जमिनीच्या सुपीकतेवर भर देण्याची गरज...
दक्षिण भारतात मुसळधार पाऊसपुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेले बुरेवी...