agriculture news in marathi, Mud in Sangli district projects | Agrowon

सांगली जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये गाळ
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 2 नोव्हेंबर 2018

सांगली ः जिल्ह्यात पाच मध्यम व ७९ लघुप्रकल्प असे ८७ प्रकल्प आहेत. या प्रकल्पात पाणी साठण्याची क्षमता ९४४०.२० दशलक्ष घनफूट आहे. मात्र, या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गाळ साठल्याने क्षमतेपेक्षा कमी पाणी साठले जाते. यामुळे या प्रकल्पातील गाळ काढण्याची मागणी शेतकरी करू लागले आहेत.

सांगली ः जिल्ह्यात पाच मध्यम व ७९ लघुप्रकल्प असे ८७ प्रकल्प आहेत. या प्रकल्पात पाणी साठण्याची क्षमता ९४४०.२० दशलक्ष घनफूट आहे. मात्र, या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गाळ साठल्याने क्षमतेपेक्षा कमी पाणी साठले जाते. यामुळे या प्रकल्पातील गाळ काढण्याची मागणी शेतकरी करू लागले आहेत.

जिल्ह्यातील सध्या दुष्काळी भागातील आटपाडी, खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्‍यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मुळात या प्रकल्पामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मिटतो. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी हे प्रकल्प पाण्याने भरून द्यावेत, अशा सूचना पाटबंधारे विभागाला केल्या आहेत. वास्तविक पाहता दोन ते तीन वर्षांपासून हे प्रकल्प कोरडेच आहेत. यामुळे या प्रकल्पातील गाळ काढण्यासाठी पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केल्याची चर्चा शेतकऱ्यांत सुरू आहे.

दुष्काळात पाणीटंचाई भासू लागली की जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजना केल्या जातात. या योजनेतून हे लघू आणि मध्यम प्रकल्पात पाणी सोडून प्रकल्प पाण्याने भरून घेतले जातात. यामुळे पाणीप्रश्‍न मार्गी लागतो. मात्र, गेल्या वर्षी अपेक्षित पाऊस झाल्याने अनेक प्रकल्पांत पाणीसाठा झाला होता. यंदा पावसाने दडी मारल्याने हे प्रकल्प कोरडे आहेत. जत तालुक्‍यात २८, आटपाडी तालुक्‍यात १३, कवठेमहांकाळ ११, खानापूर ८ आणि तासगाव तालुक्‍यात ७ मध्यम आणि लघुप्रकल्प आहेत. मात्र, हे प्रकल्प कोरडे आहेत.

पाटबंधारे विभागाच्या वतीने या प्रकल्पांतील गाळ काढला जातो. शासनाने गाळमुक्त तलाव ही योजना सुरू केली आहे. वास्तविक पाहता जिल्ह्यातील या प्रकल्पांतील तलावात साठलेला गाळ काढण्यासाठी कोणत्याही हालचाणी केलेल्या दिसत नाहीत. मात्र, तीन ते चार वर्षांपासून या प्रकल्पातील गाळ काढला नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकल्पांतील ९४४०.२० दशलक्ष घनफूटपेक्षा पाणी कमी साठले जाते.

आम्ही आमच्या गावातील तलावातील गाळ काढला होता. मात्र, पुन्हा तलावात गाळा साचलेला आहे. शासनाने तलावातील गाळ काढण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होऊन पाणीटंचाईवर मात करणे शक्‍य होईल.
- विजय शितोळे, चुडेखिंड, ता. कवठेमहांकाळ

इतर बातम्या
बीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९...उस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम...
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
वनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा...कडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...
कर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव  : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....
पुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे  ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...
कुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...
रासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली  : आगामी विधानसभा निवडणुकीत...
मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे  ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...
अकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला  ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...
कऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा  : महापुरामुळे...
गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली  ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...
शेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे  : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...
वारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...
जालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...
दर्जाहीन शिक्षण संस्थांवर कारवाई होणार...पुणे: राज्यात दर्जाहीन कृषी महाविद्यालये...
अवर्षणप्रवण, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत...अकोला ः राज्यातील अवर्षणप्रवण क्षेत्र,...
महिनाअखेरीस पावसाला पोषक हवामानपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला राज्यात दमदार...