agriculture news in marathi Mudhol Hound Dogs get National Recognition | Agrowon

मुधोळ हाऊंड श्वानास राष्ट्रीय मान्यता

डॉ.व्यंकटराव घोरपडे
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020

मुधोळ हाऊंड ही श्वान जात महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमाभागात मोठ्या प्रमाणामध्ये आढळते. हे श्वान शेतातील राखणीसाठी अत्यंत योग्य आहेत.या श्वान जातीला नुकतीच देशातील नोंदणीकृत जात म्हणून मान्यता मिळाली आहे.

मुधोळ हाऊंड ही श्वान जात महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमाभागात मोठ्या प्रमाणामध्ये आढळते. हे श्वान शेतातील राखणीसाठी अत्यंत योग्य आहेत.या श्वान जातीला नुकतीच देशातील नोंदणीकृत जात म्हणून मान्यता मिळाली आहे.

मुधोळ हाऊंड, हिमाचली हाऊंड त्याचबरोबर राजपालायम,सिपीपराइ,कान्नी या भारतीय श्वानांच्या जाती आहेत. या सर्व जाती देशातील वेगवेगळ्या भागात उपलब्ध आहेत. मुधोळ हाऊंड ही जात महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमाभागात मोठ्या प्रमाणामध्ये आढळते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी या प्रजातीचे संवर्धन केले. तसेच सैन्यदलात मानाचे स्थान दिले होते. मुधोळचे वतनदार राजे मालोजीराव घोरपडे यांनी या श्वानांच्या पिल्लांची एक जोडी लंडन भेटीत तेथील पाचव्या किंग जॉर्ज यांना भेट दिली होती. त्यावेळी त्याचे नामकरण मुधोळ हाऊंड असे करण्यात आले. एकंदर या मुधोळ हाऊंड या श्वान जातीस चांगला राजाश्रय मिळाला होता.

साधारण वीस वर्षांपासून आपल्या देशात विदेशी श्वांनांची संगोपनासाठी मागणी वाढू लागली. परदेशी श्वानांची ठेवण, वागणे आणि एकंदर त्यांची रचना ही त्या त्या त्यासंबंधित देशातील त्यांच्या मूळ हवामानाला अनुसरून असते. आपण याकडे दुर्लक्ष करतो. केवळ मोठेपणासाठी विदेशी श्वानांचा सांभाळ केला जातो. दुसऱ्या बाजूचा विचार करायचा झाल्यास भारतीय श्वान प्रजाती या प्रशिक्षणास चांगला प्रतिसाद देतात. आपल्या स्थानिक वातावरणात तयार झाल्यामुळे त्यांची शरीररचना, त्वचा, डोळे, पाय, शेपूट सुद्धा या वातावरणाशी मिळतेजुळते असणारे असते.

मुधोळ हाऊंडची वैशिष्टे 

  • मुधोळ हाऊंड श्वान शेतातील राखणीसाठी अत्यंत योग्य आहेत. मात्र शहरी वातावरणात पूर्ण क्षमतेने ही जात राहील, वागेल याची शाश्वती देता येत नाही.
  • वाढते सिंचन क्षेत्र आणि शेतावर जाऊन राहणे आणि शेती करणे यामध्ये वाढ होत आहे.त्यामुळे ही मंडळी निश्चितच या जातीचा वापर शेतावर राखणीसाठी करू शकतात.
  • नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG) मध्ये मुधोळ हाऊंड श्वान समाविष्ट होणार आहे. मुधोळ येथील केनाईन रिसर्च अँड इन्फॉर्मेशन सेंटर (सी. आर. आय. सी) येथे पिल्लांची मागणी नोंदवली आहे.
  • शरीराने बळकट व उच्च प्रतीच्या हुंगण्याच्या शक्तीमुळे तसेच त्याची हुशारी आणि आज्ञाधारकपणा यामुळे भारतीय सैन्यदलात, सुरक्षा दलात वापर सुरू झाला आहे.
  • कमी वजन, लांब पाय त्यामुळे इतर प्रजाती पेक्षा हे श्वान वेगाने धावतात. साधारण पन्नास किलोमीटर प्रति तास या वेगाने हे श्वान धावतात. तसेच तीन किलोमीटर वरील वस्तूच्या वासाचा मार्ग काढू शकतात. त्यामुळे भारतीय सीमा सुरक्षा दलासह आंध्र प्रदेश, राजस्थान सरकारने आपल्या पोलिस दलात देखील त्यांना समाविष्ट केले आहे.
  • सध्या बिदर येथील पशुवैद्यकीय विद्यापीठाच्या  आधिपत्याखाली मुधोळ येथील केनाईन रिसर्च अँड इन्फॉर्मेशन सेंटरमध्ये या प्रजातीचे प्रजनन केले जाते. इस्टेट मालक, चहाचे मळे वाले, फार्म हाऊस मालक अशी मंडळी जंगली जनावरांच्या पासून संरक्षणासाठी या जातीचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये करत आहेत.
  • नॅशनल ब्युरो ऑफ ॲनिमल जेनेटिक रिसोर्सेस (एन.बी.ए.जी.आर) या राष्ट्रीय संस्थेने २८ सप्टेंबर, २०२० च्या पत्राद्वारे मुधोळ हाऊंड श्वान जातीला देशातील नोंदणीकृत जात म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे या जातीचे अजून महत्त्व अधोरेखित होते.
  • नवयुवकांना भारतीय प्रजातीच्या जोड्या ठेवून पिल्लांची निर्मिती करणे, विक्री करणे हा चांगला व्यवसाय देखील करता येऊ शकतो.

संपर्क ः डॉ.व्यंकटराव घोरपडे, ९४२२०४२१९५
(सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त (पशुसंवर्धन), सांगली)


इतर कृषिपूरक
दूधनिर्मिती अन् प्रत टिकविण्यासाठी...दुधाचा दर हा गुणवत्तेवर अवलंबून असतो. त्यामुळे...
देशी, जर्सी, एचएफ गाईंचे अर्थशास्त्रशेतीला पूरक म्हणून पशुपालन हा व्यवसाय...
शिफारशीनुसार जनावरांना लसीकरण आवश्यक...जनावरे आजारी पडल्यामुळे दूध उत्पादनात घट, गर्भपात...
उन्हाळ्यातील म्हशींचे व्यवस्थापन जनावरांसाठी पुरेसे पाणी, खाद्याची व्यवस्था ठेवावी...
जनावरातील मूतखड्यावर गोखरू, कुलशी...मूतखडा हा आजार जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात...
नियोजन चारा, खाद्यमिश्रणाचे..जनावरांना वर्षभर लागणाऱ्या पशुखाद्य घटक, हिरवा...
शेळीपालनातील महत्त्वाच्या बाबीआपल्या गोठ्यातील शेळी स्थानिक जातीची असली तरी...
उन्हाळ्यातील जनावरांचे व्यवस्थापनगोठ्यामध्ये जनावरांना हालचाल करण्यासाठी...
फलोत्पादनासाठी शासनाच्या योजनाकृषी विभागातर्फे फलोत्पादनवाढीसाठी विविध योजना...
अळिंबी स्पॉन करताना घ्यावयाची काळजीसंशोधनाच्या आधारे भारतामध्ये अळिंबी स्पॉनसाठी...
पैदाशीच्या बोकडाचे व्यवस्थापनशेळीपालकांनी आपल्या प्रक्षेत्रावर जातिवंत बोकड...
मृदूअस्थी ः दुधाळ गाई- म्हशीतील आजारमृदूअस्थी आजार दुधाळ व गाभण गाई-म्हशींना निव्वळ...
शाश्वत गिनी पालनासाठी नवे तंत्रज्ञानस्थानिक पातळीवर गिनी, तितारी आणि चित्रा या...
सातत्यपूर्ण दूध उत्पादन देणारी निली...निली रावी म्हशीची दूध उत्पादन क्षमता ही मुऱ्हा...
जनावरातील लिस्टेरियोसिस आजारलिस्टरियोसिस आजारामध्ये जनावरे मान एकीकडे खेचून...
कोंबड्यांमधील उष्माघातावरील उपचारउन्हाळ्यात कोंबड्यांना खाद्य सकाळी व संध्याकाळी...
मत्स्य बीज खरेदी, संचयन करतानाची काळजीमत्स्य जिरे ते मत्स्य बोटुकलीपर्यंतचा काळ...
जनावरांच्या आहारात असावीत खनिज द्रव्येपचनसंस्था, प्रजनन संस्था किंवा शरीराच्या प्रत्येक...
निकृष्ट चाऱ्याचे मूल्यवर्धननिकृष्ट चाऱ्याचे रूपांतर सकस व असलेल्या...
अळिंबी स्पॉन निर्मिती प्रयोगशाळेची...चांगल्या प्रतीचे शुद्ध स्पॉन तयार करण्यासाठी...