उत्तम दर्जाच्या मुगाला ६२५० पर्यंत दर

उत्तम दर्जाच्या मुगाला ६२५० पर्यंत दर
उत्तम दर्जाच्या मुगाला ६२५० पर्यंत दर

जळगाव  ः खानदेशातील धुळे, जळगाव, साक्री, नंदुरबार, चोपडा आदी बाजारांमध्ये या हंगामातील मूग आवकेची प्रतीक्षा आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर व जळगावमधील अमळनेरात मुगाची आवक सुरू झालेली आहे. परंतु हमीभाव मिळत नसल्याची माहिती आहे.  मुगाला ६९०० चा हमीभाव सरकारने जाहीर केला आहे. मुगामध्ये आर्द्रता अधिक असल्याचे सांगून ५००० ते ६२५० रुपये प्रतिक्विंटलचा दर शेतकऱ्यांना मिळाला. जळगाव जिल्ह्यातील चोपडा, अमळनेर, धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा, नंदुरबारमधील शहादा, तळोदा भागात मुगाची काढणी सुरू झाली आहे. १०० टक्के क्षेत्रातील काढणी सुरू झालेली नसली तरी जूनच्या मध्यात पेरणी केलेल्या मुगात काढणी करावी लागत आहे. शेतकरी शेंगा वाळवून लागलीच घरीच पारंपरिक पद्धतीने त्याची मळणी करून घेत आहेत. अमळनेरच्या बाजारात सर्वाधिक ६२५० पर्यंतचा दर दर्जेदार किंवा चांगला रंग असलेल्या मुगाला मिळाला. तर शिरपुरातही दर ६३०० पेक्षा अधिक नसल्याचे सांगण्यात आले. रविवारी (ता. १) व सोमवारी (ता. २) अमळनेर व शिरपूर येथे मुगाची आवक झाली. शिरपूर येथे सुमारे १० क्विंटल तर अमळनेरात सुमारे १८ क्विंटल आवक झाली. मंगळवारी (ता. ३) जैन बांधवांच्या संवत्सर या कार्यक्रमामुळे खानदेशातील कमाल बाजार समित्यांमध्ये लिलाव, खरेदी बंदची स्थिती होती. अपवाद वगळता व्यवहार झाले नाहीत. यामुळे जळगाव, चोपडा, धुळे आदी ठिकाणी मुगाची आवकही मंगळवारी झाली नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com