Agriculture news in marathi; Mug got 6250 rate for Good Quality | Agrowon

उत्तम दर्जाच्या मुगाला ६२५० पर्यंत दर

टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 सप्टेंबर 2019

जळगाव  ः खानदेशातील धुळे, जळगाव, साक्री, नंदुरबार, चोपडा आदी बाजारांमध्ये या हंगामातील मूग आवकेची प्रतीक्षा आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर व जळगावमधील अमळनेरात मुगाची आवक सुरू झालेली आहे. परंतु हमीभाव मिळत नसल्याची माहिती आहे. 

जळगाव  ः खानदेशातील धुळे, जळगाव, साक्री, नंदुरबार, चोपडा आदी बाजारांमध्ये या हंगामातील मूग आवकेची प्रतीक्षा आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर व जळगावमधील अमळनेरात मुगाची आवक सुरू झालेली आहे. परंतु हमीभाव मिळत नसल्याची माहिती आहे. 

मुगाला ६९०० चा हमीभाव सरकारने जाहीर केला आहे. मुगामध्ये आर्द्रता अधिक असल्याचे सांगून ५००० ते ६२५० रुपये प्रतिक्विंटलचा दर शेतकऱ्यांना मिळाला. जळगाव जिल्ह्यातील चोपडा, अमळनेर, धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा, नंदुरबारमधील शहादा, तळोदा भागात मुगाची काढणी सुरू झाली आहे. १०० टक्के क्षेत्रातील काढणी सुरू झालेली नसली तरी जूनच्या मध्यात पेरणी केलेल्या मुगात काढणी करावी लागत आहे. शेतकरी शेंगा वाळवून लागलीच घरीच पारंपरिक पद्धतीने त्याची मळणी करून घेत आहेत.

अमळनेरच्या बाजारात सर्वाधिक ६२५० पर्यंतचा दर दर्जेदार किंवा चांगला रंग असलेल्या मुगाला मिळाला. तर शिरपुरातही दर ६३०० पेक्षा अधिक नसल्याचे सांगण्यात आले. रविवारी (ता. १) व सोमवारी (ता. २) अमळनेर व शिरपूर येथे मुगाची आवक झाली.

शिरपूर येथे सुमारे १० क्विंटल तर अमळनेरात सुमारे १८ क्विंटल आवक झाली. मंगळवारी (ता. ३) जैन बांधवांच्या संवत्सर या कार्यक्रमामुळे खानदेशातील कमाल बाजार समित्यांमध्ये लिलाव, खरेदी बंदची स्थिती होती. अपवाद वगळता व्यवहार झाले नाहीत. यामुळे जळगाव, चोपडा, धुळे आदी ठिकाणी मुगाची आवकही मंगळवारी झाली नाही.


इतर बाजारभाव बातम्या
परभणीत पेरू १५०० ते २५०० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात काकडीला ५०० ते २००० रुपये दरअकोला येथील बाजारात गुरुवारी (ता. ५) काकडीची...
सोलापुरात कांद्याला २० हजार कमाल दर सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
कापसाची ४९०० ते ५००० रुपये दरात खेडा...जळगाव  ः राज्यात कापूस पट्ट्यात कापसाचे दर...
जळगावात भरताची वांगी १८०० ते ३५०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. ४...
सांगलीत गूळ सरासरी ३४६० रुपये सांगली :  येथील बाजार समितीत गुळाची आवक कमी...
कोल्हापुरात टोमॅटोच्या आवकेत वाढकोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात...
औरंगाबाद : बाजरी, सोयाबीनचे दर स्थिर;...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुण्यात पालेभाज्यांसह शेवगा, बीटच्या...पुणे ः अवकाळी पावसामध्ये खरिपातील...
औरंगाबादेत गाजर २००० ते २५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत मेथी जुडी प्रतिशेकडा ६०० ते १०००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात कांदा दोन ते दहा हजार रुपये...पुणे ः गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरातील...
जळगावात वांगी १८०० ते २९०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (...
सोलापुरात कांद्याला कमाल ११ हजार दरसोलापूर: सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
पुणे बाजार समितीत तैवान पिंक पेरूची आवकपुणे : राज्यात सध्या पेरूचा हंगाम सुरू झाला असून...
सोलापुरात गवार, भेंडी, काकडीला उठावसोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगरला सोयाबीनची आवक वाढलीनगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या...
कोल्हापुरात गतसप्ताहापासून कांदा दरात...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
पुण्यात वांगी, घेवडा, शेवग्याच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...