मूग, उडिद सोयाबीन नोंदणीची मुदत पुन्हा वाढवली

मूग, उडिद सोयाबीन नोंदणीची मुदत पुन्हा वाढवली
मूग, उडिद सोयाबीन नोंदणीची मुदत पुन्हा वाढवली

नगर ः आधारभूत किमतीने मूग, उडिद, सोयाबीनची खरेदी करण्यासाठी शासनाने ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे. मुदत वाढवूनही नोंदणीला फारसा प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. आता पुन्हा एकवीस दिवसांसाठी नोंदणीची मुदत वाढवली असून, आता तीनही पिकांची १५ नोव्हेंबरपर्यत नोंदणी सुरू राहणार आहे. दरम्यान आत्तापर्यंत मूग, सोयाबीन, उडदाची मिळून ७ हजार ८५७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

शेतकऱ्यांच्या मालाची हमीदरानुसार खरेदी करणे बंधनकारक असताना व्यापारी मात्र मालाचा दर्जा चांगला नसल्याचे कारण पुढे करत (आधारभूत) हमीदराने खरेदी केली जात नाही. त्यामुळे शासनाने खरेदी मूग, उडीद, सोयाबीनसह अन्य शेतमालाची हमीदराने खरेदी करता यावी यासाठी शासनीने हमी केंद्रे सुरू करण्याची मागणी केली जात होती. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने कृषी विभागाकडून उत्पादनाच्या शक्‍यतेची माहिती घेऊन खरेदी केंद्रे सुरू करण्याचे वरिष्ठांना कळवले होते. २५ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी सुरू केली.

९ आक्‍टोबरपर्यंतचा कालावधी दिला होता. पंधरा दिवसांचा अवधी असला तरी प्रत्यक्षात केवळ सहा ते सात दिवसच नोंदणी करता आल्याने पुन्हा पंधरा दिवसांची मुदत वाढवून २४ आक्‍टोबरपर्यंत करण्यात आली होती. मात्र, मुदतवाढीतही फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याने आता पुन्हा एकवीस दिवस म्हणजे १५ नोव्हेंबरपर्यंत सोयाबीन, मूग, उडदाची ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ देण्याची नामुष्की आली. दरम्यान दोन वेळा मुदतवाढ देऊनही आतापर्यंत सात हजार ८५७ शेतकऱ्यांनी हमी केंद्रावर सोयाबीन, मूग, उडीद विक्री करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी केल्याचे सांगण्यात आले. गेल्या वर्षी खरेदी केंद्रे चालकांकडून झालेला त्रास, पैसे मिळण्यास लागणारा उशीर अशा अनेक कारणाने ऑनलाइन नोंदणीला प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगितले जात आहे.

खरेदी केंद्रे सुरू तरी कधी होणार? शेतकऱ्यांच्या मालाची बाजारात हमीदरानुसार खरेदी होत नसल्याने शासनाने हमी केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला. केंद्रे सुरू करणार असल्याचे सांगून आता दोन महिन्यांचा कालावधी झाला. ऑनलाइन नोंदणीही करुन घेतली जात आहे. मात्र, अजून जिल्ह्यामध्ये कुठेही खरेदी केंद्र सुरू करण्याच्या हालचाली दिसत नाहीत. खरेदी केंद्रे सुरू कधी होणार, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

नगर जिल्ह्यामध्ये मूग, उडदाची बाजारपेठेत हमीदराने खरेदी होताना दिसत नाहीत. एकतर हमी केंद्रे आत्तापर्यंत सुरू व्हायला पाहिजे होती. मात्र ती सुरू झाली नाही. आता ऑनलाइन नोंदणीची मुदत वाढवली, पण खरेदी केंद्रे नेमके कधी सुरू करणार आहेत. -शरद मरकड, पाथर्डी, जि. नगर

आतापर्यंत झालेली नोंदणी  मूग        ः १३९७  सोयाबीन ः १२८  उडीद        ः ६३१२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com