मुगाची ३३ हजार, उडदाची ३८ हजार टन होणार खरेदी

मूग आणि उडीद खरेदीला मान्यता दिली आहे. केंद्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांकडून हमीभावाने ३३ हजार टन मूग आणि ३८ हजार ६६५ टन उडदाची खरेदी करण्यास परवानगी दिली आहे.
Muga will be purchased at 33,000 tonnes and Udda at 38,000 tonnes
Muga will be purchased at 33,000 tonnes and Udda at 38,000 tonnes

पुणे : ओल्या दुष्काळात भरडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने मूग आणि उडीद खरेदीला मान्यता दिली आहे. केंद्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांकडून हमीभावाने ३३ हजार टन मूग आणि ३८ हजार ६६५ टन उडदाची खरेदी करण्यास परवानगी दिली आहे. यासाठी १५ ऑक्टोबरपासून नोंदणीला प्रारंभ होणार आहे. सोबतच सोयाबीनच्या नोंदणीलाही सुरुवात होणार आहे.  

राज्य शासनाच्या पणन विभागाने पाठविलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, साधारणपणे राज्यात उत्पादित होणाऱ्या २५ टक्के उत्पादन खरेदीच्या अनुषंगाने हा लक्ष्यांक निश्‍चित करण्यात आला आहे. त्यापूर्वीच राज्य शासनाने पूर्वतयारी पूर्ण केली असून, ५ ऑक्टोबरपासूनच शेतकऱ्यांची हमीभाव खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्र शासनाने महाराष्ट्रात ३३००० टन मूग आणि ३८६६५ टन उडीद खरेदीला बुधवारी परवानगी दिली आहे. 

‘शेतकऱ्यांना खरेदी प्रक्रिया सुलभ होण्यासाठी महाएफपीसी मार्फत राज्यातील १८ जिल्ह्यांमधील शेतकरी उत्पादक कंपन्या स्तरावर खरेदी केंद्रे प्रस्तावित केली आहेत. तसेच याबाबतची सर्व सुविधा शेतकरी उत्पादक कंपनीच्या सामुदायिक सुविधा केंद्रावर असणार आहे,’’ असे महाएफपीसीचे व्यवस्थापकीय संचालक योगेश थोरात यांनी सांगितले.

देशातील अनेक राज्यांमध्ये यापूर्वीच मूग आणि उडदाच्या हमीभाव खरेदी सुरू झाली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरीही खरेदी सुरू करण्याची मागणी करत होते. त्यानुसार सरकारने मान्यता दिली आहे. राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये मूग आणि उडीद हमीभावापेक्षा कमी दराने विकले जात आहेत. त्यात उडदाला अनेक ठिकाणी चांगला दर मिळत असला तरी हमीभावाने खरेदीची आवश्यकता होती. 

‘‘सरकारच्या या निर्णयाने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. पावसामुळे आधीच हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. त्यातच बाजारात पडलेल्या दराने खरेदी होत होती. आता खरेदी केंद्रे सुरू झाल्यानंतर हमीभावाचा तरी एक आधार राहील,’’ असे नशिराबाद येथील शेतकरी बालाजी जाधव यांनी सांगितले. राज्यात मुगाची ३३ हजार टन हमीभावाने खरेदी होणार आहे. तर ३८ हजार ६६५ टन उडदाची खरेदी केली जाणार आहे. यासाठी १५ ऑक्टोबरपासून नोंदणीला प्रारंभ होणार आहे. याच दरम्यान प्रत्यक्ष खरेदीला प्रारंभ होण्याची शक्यता आहे.

मुगाला हमीभाव ७२७५ रुपये असून, आमच्या भागात सध्या मुगाला सहा ते साडेसहा हजारांच्या दरम्यान दर मिळत आहे. मी उडीद विकला मात्र दर नसल्याने मूग ठेवला आहे. खरेदी केंद्रे सुरू झाल्यास किमान हमीभाव तरी मिळेल. - ओमकार शिंदे,  सनपुरी, ता. जि. परभणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com