अकोला जिल्ह्यात मुगाची  हेक्टरी १०० किलो उत्पादकता 

यंदाच्या हंगामात अतिवृष्टीने मुग, उडीद, सोयाबीन पिकांची उत्पादकता मोठ्या प्रमाणात घटलेली आहे. यंदा मुगाची हेक्टरी १०० किलो एवढीच उत्पादकता आली आहे.
Mugachi in Akola district Productivity 100 kg per hectare
Mugachi in Akola district Productivity 100 kg per hectare

अकोला ः यंदाच्या हंगामात अतिवृष्टीने मुग, उडीद, सोयाबीन पिकांची उत्पादकता मोठ्या प्रमाणात घटलेली आहे. यंदा मुगाची हेक्टरी १०० किलो एवढीच उत्पादकता आली आहे. या उत्पादकतेच्या आधारेच हमीभाव खरेदी केली जात असून, काही शेतकऱ्यांना मात्र हा प्रकार अडचणीचा झाला आहे. एकरी ४० किलो मूग शासन घेणार असल्याने जिल्ह्यात या केंद्राकडे एकही शेतकरी फिरकलेला नाही.  शासनाच्या आदेशानुसार केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत हमीदराने मूग, उडीद, सोयाबीन या शेतमालाची शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. यासाठी यंत्रणाकडून खरेदी केंद्रांना परवानगी दिल्या गेली. त्यानुसार जिल्ह्यात मूग व उडदासाठी नावनोंदणीची प्रक्रीया राबवण्यात आली. आता ही खरेदी करण्यासाठी शासनाने हंगामात मुगाचा हमीभाव प्रति क्विंटल ७२७५ रुपये सुद्धा निश्‍चित केला आहे. बाजार समित्यांमध्ये सध्या मुगाला सरासरी ५५०० पर्यंत दर मिळत आहे. जिल्ह्यात बहुतांश शेतकऱ्यांचे मुगाची पीक हातातून गेले. अकोट तालुक्यात खारपाण पट्ट्यात काही गावांमध्ये मुगाची उत्पादकता एकरी दोन ते तीन क्विंटलदरम्यान आलेली आहे. आता या शेतकऱ्यांना मुग विक्रीसाठी अडचणी येत आहेत. हमीभाव खरेदी ही उत्पादकतेच्या निकषानुसार केली जाते. उत्पादकता ही एकरी ४० किलो एवढी निघालेली असल्याने इतका कमी मुग विक्रीला शासकीय केंद्रावर नेणे तरी परवडते काय, असा प्रश्‍न शेतकरी करीत आहेत. एकरी १२ ते १५ किलो मुगाची पेरणी केलेली असताना शासन केवळ ४० किलो घेणार असेल तर काय फायदा, असे प्रश्‍न तरोडा भागातील शेतकरी विचारत आहेत. उत्पादकतेचा निकष काही भागासाठी शिथिल करून किमान एकरी दीड क्विंटलपर्यंत तरी शासनाने मुगाची खरेदी करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. 

जिल्हानिहाय मुगाची उत्पादकता (प्रति हेक्टर, किलो)  अकोला १००  वाशीम ५७०  अमरावतीत २००  यवतमाळ ३१०  बुलडाणा ५९०  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com