यात्रोत्सवानिमित्त आदिशक्ती मुक्ताईचा जयघोष

Muktai's announcement on the occasion of the yatra
Muktai's announcement on the occasion of the yatra

मुक्ताईनगर/चांगदेव, जि. जळगाव ः कोथळी व मेहूण येथे आदिशक्ती मुक्ताबाईच्या यात्रोत्सवात शेकडो दिंड्या सहभागी झाल्या आहेत. टाल मृदंगच्या गजरात पावली घेत वारकऱ्यांनी मुक्ताईचा जयघोष केला. कीर्तन व भजानांनी परिसर दुमदुमला. भक्तिमय वातावरणात लाखो भाविकांनी दर्शन घेतले. 

राज्यासह मध्यप्रदेशातील अनेक दिंड्यांचे आगमन झाले. नवीन मुक्ताई मंदिरानजीक सुमारे दीडशे फड असून भजन, कीर्तन सोहळे सुरू आहेत. पहाटेच भाविकांनी तापी पूर्णा संगमावर स्नान केले. पहाटे आरती झाली. आरतीचा मान संस्थानचे अध्यक्ष रवींद्र पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार चंद्रकांत पाटील, यामीनी पाटील यांना मिळाला. 

याप्रसंगी उद्धव महाराज जुनारे, बी. आर. पाटील, सुभाष पाटील, प्रशांत टोंगे, संतोष कोळी, चंद्रकांत मराठे, सुनील गवते व भाविक उपस्थित होते. आमदार चंद्रकांत पाटील व यामीनी पाटील यांच्याहस्ते मुक्ताईला साडी-चोळी अर्पण करण्यात आली. तसेच महाअभिषेक करण्यात आला. यावल तालुक्‍यातील सांगवी येथील मानाचे वारकरी ललिता नेमाडे व तुकाराम नेमाडे यांचा सपप्नीक सत्कार मान्यवरांनी केला. 

संत मुक्ताई नवीन मंदिरात पहाटे चार वाजता संस्थानचे विश्वस्त पंजाबराव पाटील यांनी सपत्नीक महापूजा केली. संत मुक्ताबाई समाधीस्थळी सकाळपासून दिंड्या नगर फेरीस बाहेर पडल्या. जुन्या मुक्ताई मंदिरात फराळाची व्यवस्था सीताराम तेली (वरणगाव) तर बारीमध्ये पाण्याची व्यवस्था सीव्हील सोसायटीने केली. महाशिवरात्रीला दिंड्या चांगदेव भेटीसाठी जातील. यात्रेत आरोग्य दूत, वैद्यकीय अधिकारी रुग्णवाहिका भाविकांच्या सेवेसाठी सज्ज आहेत. 

दिंड्याचा फडावरील चैतन्य  दशमिला पोहचलेल्या दिंड्या नगरप्रदिक्षणा घातल्यानंतर मुक्ताईदरबारी दाखल होतात. दर्शन घेतल्यावर आपल्या मुक्कामाचा फडावर पोहचतात. रात्री उशिरापर्यंत हरिनामाचा गजर सुरु असतो. फडावरील टाळ मृंदगाचा गजरात सुरू असलेली पावली असो की थकवा दूर करणाऱ्या भारुडात वारकरी तल्लीन होतात.

दृष्टिक्षेपात 

  • दर्शनासाठी रांगा 
  • तीनशे दिंड्या दाखल 
  • ग्रंथ, हरिपाठ, तुकाराम गाथांची मोठी विक्री 
  • जादा बसेसची व्यवस्था   
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com