Agriculture News in Marathi mula, bhandardhara, nilwandwe dam start Discharge water | Agrowon

मुळा, भंडारदरा,  निळवंडेतून विसर्ग 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021

अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात दोन दिवसांपासून पाऊस सुरू झाल्यामुळे भंडारदरा मुळा निळवंडे धरणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे तीनही धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. 

नगर : अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात दोन दिवसांपासून पाऊस सुरू झाल्यामुळे भंडारदरा मुळा निळवंडे धरणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे तीनही धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. २६ टीएमसी क्षमतेचे मुळा धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे धरण प्रशासनाने जाहीर केले आहे.
 
अकोले तालुक्यातील पश्चिम भागात झालेल्या जोरदार पावसामुळे पंधरा दिवसांपूर्वी भंडारदरा आणि निळवंडे धरण भरले. मुळा धरण आताही पाण्याचे जोरदार आवक झाली. मागील आठवड्यात ९५ टक्के पाणी साठा झाल्यानंतर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला होता परंतु पाण्याची आवक कमी होताच निसर्ग पुन्हा बंद करण्यात आला. बुधवारी (ता.२२) रात्री धरणात ९९.२२ टक्के झाल्यानंतर धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे जाहीर करून दोन हजार क्युसेकने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला.

गुरुवारी (ता. २३) सकाळी तो विसर्ग कायम होता. १५२३ क्युसेकने मुळा धरणात पाण्याची आवक सुरू आहे. दोन्ही कालव्यांतूनही पाण्याचे आवर्तन सुरू केले आहे. धरणसाठा ९९.२२ टक्के झाला आहे. त्यामुळे धरण परिचलनानुसार नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आला आहे. तीस सप्टेंबरअखेर धरणसाठा स्थिर ठेवून उर्वरित पुराचे पाणी नदीपात्रात व कालव्यांद्वारे सोडले जाणार आहे.

१५ ऑक्टोबर दरम्यान धरणाखालील मुळा नदीपात्रातील डिग्रस, मानोरी, मांजरी व वांजूळपोई बंधाऱ्यांमध्ये टप्प्याटप्प्याने फळ्या टाकून बंधारे भरले जातील. १५ ऑक्टोबर रोजी बंधारे व धरण शंभर टक्के भरले जाईल. सकाळी सहा वाजता भंडारदरा धरणातून ११७० क्युसेक, तर निळवंडे धरणातून २३७० क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येत होते. नाशिक जिल्ह्यातही जोरदार पाऊस होत असल्याने नांदूर मधमेश्‍वरमधून १५ हजार ७७५ क्युसेक विसर्ग केला जात असल्यामुळे गोदावरी नदीची पाणीपातळी वाढली आहे. या वर्षी धरणासाठी पावसाची परिस्थिती चांगली असल्याचे पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त अभियंता हरिश्‍चंद्र चकोर यांनी सांगितले.


इतर बातम्या
अन्नधान्य भाववाढीच्या चर्चा निराधारपुणे : सध्या अन्नधान्य महागाईच्या चर्चांना ऊत आला...
राज्यात थंडीची चाहूलपुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
इंधन दरवाढ, महागाई दिसत नाही, कांद्याची...नाशिक : एकीकडे इंधन खर्च, निविष्ठांचे वाढते दर,...
पावसामुळे द्राक्ष हंगामात अडचणी वाढल्यानाशिक : सप्टेंबर महिन्यापासून द्राक्ष उत्पादक...
सरासरी ते सरासरीपेक्षा कमी तापमानाचा...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) १४...
महाराष्ट्राच्या समृद्ध पीकसंपदेचा...संगमनेर, जि. नगर ः ‘‘महाराष्‍ट्रात पिकांची मोठी...
सांगली जिल्ह्यात ५० टक्के द्राक्ष...सांगली : जिल्ह्यात द्राक्ष पिकाच्या फळछाटणीची गती...
आता तुम्हीच शोधा  कुठला कारखाना कुणी... पुणे : गेल्या पंधरा वर्षांत ६५ सहकारी साखर...
स्वाभिमानी-कारखानदार संघर्ष अटळ;  ‘...सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू, गुरुदत्त,...
पुणे जिल्ह्यातील आठवडे बाजार  सुरू...पुणे : कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करून...
सोयीच्या लोकांची प्रकरणे  सोमय्या झाकून...पुणे : राज्यात एकूण ४३ कारखान्यांची विक्री...
लखीमपूर खेरी घटनेतील  शेतकऱ्यांच्या...वर्धा : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे भाजप...
नगर जिल्ह्यात रब्बीची  सहा टक्के पेरणी  नगर ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत रब्बीची ६...
रब्बीत यंदाही राहणार  हरभऱ्याचाच...अकोला : लवकरच रब्बीची लागवड सुरू होत आहे. या...
राज्यभरात निघणार लखीमपूर खेरी  किसान...  नाशिक : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी...
धुळे जिल्हा बँकेत तिघे जण बिनविरोधधुळे ः धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेची १७ जागांसाठी...
सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या ...बुलडाणा : विदर्भ, मराठवाडा, खानदेशातील कापूस,...
`तंत्रज्ञान पोहोचविण्यात कृषी...हिंगोली  ः ‘‘कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान...
नांदेड जिल्ह्यात ग्रामबीजोत्पादनात सात...नांदेड : जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी सहा हजार ३१...
यवतमाळ :नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या ...आर्णी, यवतमाळ : परतीच्या पावसाने खरीप पिकांची...