जालना जिल्ह्यात १०६६ एकरवर तुती

Mulberry on 1066 acres in Jalna district
Mulberry on 1066 acres in Jalna district

जालना : जिल्ह्यात १०६६ एकरावर तुतीचा क्षेत्रविस्तार झाला आहे. मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद व औरंगाबाद जिल्ह्यानंतर सर्वाधिक तुती क्षेत्र असलेल्या जिल्ह्यात जालन्याचा क्रमांक लागतो हे विशेष. 

प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात २०१९-२० मध्ये १५ डिसेंबर अखेरपर्यंत १०३५ एकरवर तुती होती. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी १ लाख ६ हजार १५० अंडीपूंजच्या पुरवठ्यातून १५ टन कोषांचे उत्पादन केले होते. सर्वाधिक तुतीचे क्षेत्र घनसावंगी तालुक्‍यात आहे. २२४ शेतकऱ्यांनी २२४ एकरवर तुतीची लागवड केली आहे. त्यापाठोपाठ मंठा तालुक्‍यात १८८ शेतकऱ्यांनी १९२ एकर , जालना १९८ शेतकऱ्यांनी १९८ एकर, परतूरमध्ये १७६ शेतकऱ्यांनी १८० एकर, अंबडमध्ये १०६ शेतकऱ्यांनी ११२ एकर, बदनापुरात ९० शेतकऱ्यांनी ९० एकर, भोकरदनमध्ये ५९ शेतकऱ्यांनी ५९ एकर, तर जाफ्राबाद तालुक्‍यातील २८ शेतकऱ्यांनी २८ एकरवर रेशीम कोषाचे उत्पादन घेणे सुरू ठेवले आहे. 

या क्षेत्रापैकी ९३६ शेतकऱ्यांकडे मनरेगांतर्गत कामे सुरू आहेत. त्यामध्ये तुती लागवड, किटक संगोपन, कुशल पेमेंट आदीची कामे केली जात आहेत. जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेल्या रेशीम कोष बाजारपेठेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विक्रीसाठी कोष घेवून येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या २०१८-१९ च्या तुलनेत वाढली  आहे.

यंदा वाढलेल्या दरामुळे रेशीम कोष बाजारपेठेत गतवर्षीच्या तुलनेत कोष खरेदीची उलाढाल डिसेंबर २०१९ अखेर जवळपास दुप्पट वाढली. वाढलेले तुतीचे क्षेत्र व शेतकऱ्यांचा सहभाग पाहता पुढील वर्षी कोष उत्पादकांना प्रतिकिलो ५० रूपये दराने अनुदान देण्यासाठी जवळपास दीड कोटी रूपयांची मागणी करण्यात आल्याची माहिती रेशीम विभागाच्या सूत्रांनी दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com